दुचाकी लवकर परत न केल्याने लाकडी पाटीने बेदम मारहाण

दोन महिलांसह एकाची मारहाण, तिघांविरोधात गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: कामानिमित्त दिलेली दुचाकी वेळेत परत न केल्याने एकाला लाकडी पाटीने बेदम मारहाण करण्यात आली. बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली. इजासन फाट्याजवळ ही घटना घडली. या प्रकरणी तिघांविरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

विनोद मधूकर मेश्राम (27) हा गोडगाव ता. वणी येथील रहिवासी असून तो मजुरी करतो. त्याने इजासन ता. झरी येथील दडांजे कुटुंबीयांशी गेल्या अनेक वर्षांपासून ओळख आहे. त्यामुळे त्यांनी कामानिमित्त त्यांच्याकडून दुचाकी घेतली होती. बुधवारी दिनांक 7 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास विनोद हा इजासन फाट्याजवळ दोन महिलांसह आला. त्याने विनोदला सकाळी नेलेली मोटारसायकल लवकर का परत केली नाही, असे म्हणून विचारणा केली.

यावरून या तिघांचा विनोद सोबत वाद झाला. वाद शिविगाळ पर्यंत पोहोचला. वाद वाढून भवानीने लाकडी पाटीने विनोदच्या डोक्यावर प्रहार केला. तर भवानी सोबत असलेल्या दोन्ही महिलांनी विनोदला शिविगाळ करत मारहाण केली. मारहाण झाल्यानंतर विनोद घरी गेला. त्याने कायर येथे जाऊन उपचार केला व वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिन्ही आरोपींविरोधात भादंविच्या कलम 324, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

वणीचा हर्षल झळकला शार्क टँकमध्ये… वणी बहुगुणीच…

Comments are closed.