चिखलगाव रेल्वे गेट ते वरोरा रोड रेल्वे गेटपर्यंत सिमेंट रोड कामाला मंजुरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आ. बोदकुरवार यांना पाठविले पत्र, 24.58 कोटीच्या कामाची निविदा लवकरच
जितेंद्र कोठारी, वणी : केंद्रीय रस्ते विकास निधी (सीआरआयएफ) अंतर्गत वणी शहरातील चिखलगाव रेल्वे गेट ते वरोरा रोड रेल्वे गेटपर्यंत फोरलेन सिमेंट रस्त्याच्या कामाला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. 24.58 कोटीच्या निधीतून होणाऱ्या कामाबाबत केंद्रीय सडक परिवहन व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांना पत्र पाठवून निधी मंजूर केल्याचे कळविले आहे.
वणी येथील चिखलगाव रेल्वे क्रॉसिंग ते वरोरा रोड रेल्वे क्रॉसिंगपर्यंत दुभाजकसह सिमेंट काँक्रेट रस्त्याची नागरिकांची अनेक वर्षांपासून मागणी होती. नागरिकांच्या मागणीच्या अनुषंगाने आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी 17 जुलै 2020 रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे लेखी मागणी करून निधी देण्याची मागणी केली होती.
आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची मागणीला मान देऊन केंद्रीय रस्ते विकास निधी 2020-21 अंतर्गत सदर कामासाठी 2458.58 लक्ष रुपये मंजूर केल्याचे पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आमदार बोदकुरवार यांना पाठविले. चिखलगाव रेल्वे क्रॉसिंग ते बस स्टॅन्ड, टिळक चौक ते वरोरा रोड रेल्वे क्रॉसिंग पर्यंत ड्रेनेज, स्ट्रीट लाईट व डिव्हायडरसह फोरलेन सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाची निविदा सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे लवकरच काढण्यात येणार आहे.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा
राज्यातील दिव्यांगांचे लसीकरण प्राधान्याने व्हावे- स्माईल फाउंडेशन
हेदेखील वाचा