शनिवारी कोरोनाबाधिताचा मृत्यू तर एक पॉजिटिव्ह

दुसरा पॉजिटिव्ह निघाला चिमूरचा

0

जब्बार चीनी, वणी: शनिवारी दिनांक 10 ऑक्टोबर रोजी आनंदनगर येथील कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. तर तालुक्यातून एक पॉजिटिव्ह निघाला. रिपोर्टनुसार दुसरी पॉजिटिव्ह व्यक्ती ही चिमूरची आहे. शनिवारच्या रिपोर्टनुसार पॉजिटिव्ह व्यक्ती जैन ले-आऊटमधील आहे. आलेल्या अहवालानुसार कोरोना बाधितांची एकूण संख्या 672 झाली आहे.

शनिवारी 12 संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. अद्याप 56 अहवाल येणे बाकी आहेत. सध्या तालुक्यात एकूण 672 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 652 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. सध्या तालुक्यात 22 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर कोरोनाबाधितांच्या मृत्यूची एकूण संख्या 20 झाली आहे.

शनिवारी 3 कोरोनामुक्त व्यक्तींना सुट्टी

शनिवारी 3 कोरोनामुक्त व्यक्तींना सुट्टी झाली. सध्या तालुक्यात 22 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 7 व्यक्तींवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. तर 17 रुग्ण होम आयसोलेट आहेत. यवतमाळ येथील जीएमसी येथे 5 व्यक्तींवर उपचार सुरू आहेत. सध्या कोविड केअर सेन्टरमध्ये रुग्ण आणि संशयीत असे 7 व्यक्ती भरती आहेत.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.