मुकुटबन येथे वाढताहेत कोरोनाचे रुग्ण?

नागरिकांनी घ्यावी दक्षता, राहावे सतर्क

1

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सर्वात जास्त लोकसंख्या व बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या मुकुटबन येथे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याची माहिती मिळत आहे. बाजारपेठमधील दोन दुकानदारांना व एका अन्य व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगण्याची गरज आहे. त्यांनी सतर्क राहून शासनाच्या नियमांचे पालन करावे. असे आवाहन करण्यात येत आहे.

यापूर्वी येथीलच खाजगी सिमेंट कंपनीत आणि रेल्वे क्वॉर्टरमध्ये रुग्ण आढळलेत. एक दीड वर्षांचा मुलगा पोजिटिव्ह आढळला होता. परंतु आता मुख्य बाजारपेठेतील दुकानदारांना कोरोनाची बाधा होत आहे. बाजारपेठेमध्ये परिसरातील हजारों लोक तसेच सिमेंट कंपनीतील परप्रांतीय लोक खरेदी-विक्री करण्याकरिता येतात.

तसेच बँक व शासकीय कामकरितादेखील येथे वर्दळ असतेच. बहुसंख्य लोक तोंडावर मास्क बांधून नसतात. तर सोशल डिस्टन्सिंगचा तर फज्जाच उडाला आहे. शासनाच्या कोणत्याच नियमाचे पालन न करता अनेक लोक बिनधास्त फिरताना दिसत आहेत. थंडीमुळे कोरोनाचा सर्वाधिक धोका जनतेला होणार असल्याची माहिती शासकडून वारंवार सांगण्यात येत आहे.

असे असताना जनता बिनधास्त फिरत आहे. गावातील रुग्ण हे मुकुटबन व झरी येथे तपासणी न करता नागपूर किंवा चंद्रपूरसारख्या ठिकाणी तपासणी करून तिकडेच उपचार घेऊन परत येत आहेत. तर काही नागपूरलाच १५ दिवस दवाखान्यात काढत आहेत. त्यामुळे तालुका आरोग्य विभागाजवळ याची माहितीसुद्धा नाही किंवा नोंदही नाही.

अश्या रुग्णांमुळे गावातील जनतेला कोरोनाचा धोका बळावला आहे. याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन गेडाम यांना विचारणा केली. तेव्हा याबाबत आमच्याकडे नोंद नाही. कारण यवतमाळ जिल्ह्यात तपासणी केली नसल्याने या रुग्णांची नोंद नसल्याचे त्यांनी सांगितले. परंतु मुकुटबन गाव मोठे असून लोकसंख्या जास्त आहे. गावात कोरोनाचा संसर्ग वाढल्यास आटोक्यात आणणे कठीण जाणार आहे.

तसेच मुकुटबन गावात लाऊडस्पीकर लावून जनतेला माहिती देणार. नंतर सर्व दुकानदारांची तपासणी करणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी मोहन गेडाम यांनी सांगितले आहे. मुकुटबनसह तालुक्यातील जनतेने सामाजिक बांधीलकी जोपासून स्वतःहून कोरोनाची तपासणी करून घ्यावी. जेणेकरुन आपल्या कुटुंबासह इतर जनतेची रक्षा करता येईल.

तपासणी केल्यानंतर कोरोना पॉजिटिव्ह रुग्णाची परिस्थिती पाहून त्याला घरीच क्वॉरंटाईन करता येते किंवा भरती करावे लागते. त्यामुळे कुणालाही भिण्याचे कारण नाही. असे मत गेडाम यांनी मांडले. जनतेच्या सेवेकरिता आरोग्यविभाग सदैव तत्पर असून गावकऱ्यांच्या सहकार्याने आमची चमू तपासणी करिता तयार आहे असेही ते बोलले.

तरी तालुक्यातील सर्व जनतेनी शासनाच्या नियमाचे पालन करून कोरोनाची तपासणी प्रत्येक व्यक्तीने करावी. असे आवाहन आरोग्यविभातर्फे करण्यात आले .आहे.

हेदेखील वाचा

रेती तस्करांमध्ये खळबळ, शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई

हेदेखील वाचा

घोन्सा रोडवर दोन अवैध दारुविक्रेते अटकेत

1 Comment
  1. […] मुकुटबन येथे वाढताहेत कोरोनाचे रुग्ण… […]

Leave A Reply

Your email address will not be published.