रब्बी पिकांसाठी नवरगाव धरणाचे पाणी सोडण्याची मागणी

कालव्यात वाढलेत वृक्ष; अनेक ठिकाणी पडल्यात भेगा

0

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात रब्बी पिकांसाठी शेतकऱ्यांनी जमीन तयार करून ठेवली. पेरणीची तयारीही सुरू झाली. परंतु अजूनपर्यंत नवरगाव धरणाचे पाणी सोडले नसल्याने शेतकरी हतबल झालेत. सिंचनसाठी पाणी त्वरित सोडावे असी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

तालुक्यातील शेती हिरवीगार व्हावी. शेतकरी समृद्ध होऊन त्यांचीआर्थिक उन्नती व्हावी. या उदात्त हेतूने काही वर्षांपूर्वी नवरगाव येथे मध्यम प्रकल्प (धरण ) निर्माण करण्यात आले. त्या धरणातून अनेक शेतकऱ्यांची स्वप्ने साकार होणार होती. परंतु अनेक शेतशिवरांतून जाणाऱ्या कालव्यामध्ये असंख्य वृक्ष वाढलेत.

कालव्याला भेगा पडल्याने अक्षरश: कालव्याची दुरवस्था झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना पाण्याची गरज आहे, अशा शेतकऱ्यांना पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. तालुक्यात असंख्य शेतकऱ्यांचे सोयाबीन निघाले. अनेक शेतकऱ्यांनी आता चणा, गहू आदी रब्बी पीकं घेण्यासाठी जागा साफ केली. रब्बीची तयारी केली आहे. तालुक्यातील काही अंतरावर असलेल्या नवरगाव धरणातून रब्बी पिकांसाठी अजूनही पाणी सोडण्यात आले नसल्याने शेतकरी पाण्याची वाट बघत आहे.

हेदेखील वाचा

‘त्या’ शेतमजुराच्या संग्रहात आहे जवळपास ५० हजार अनमोल ठेवा

हेदेखील वाचा

घोन्सा रोडवर दोन अवैध दारुविक्रेते अटकेत

Leave A Reply

Your email address will not be published.