आज तालुक्यात 6 पॉजिटिव्ह

एॅक्टिव्ह पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या घटली

0

जब्बार चीनी, वणी:  सोमवारी दिनांक 11 जानेवारी रोजी तालुक्यात कोरोनाचे तब्बल 06 रुग्ण आढळलेत. यातील 3 रुग्ण हे वणी शहरात तर 3 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. शहरातील इंदिरा चौक 2, पोलिस काॅलनी 1, राजूर काॅलरी 2, कुंभारखनी वसाहत 1 असे रुग्ण आहेत.

तसे पाहता एॅक्टिव्ह पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या घटली आहे. आज 31 व्यक्तींची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट घेण्यात आली. यात 06 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत  तर उर्वरित संशयीत निगेटिव्ह आलेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

तालुक्यात 13 ऍक्टिव्ह रुग्ण

सध्या तालुक्यात एकूण 1159 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 1121 रुग्ण कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. आज 01 कोरोनामुक्त व्यक्तीला सुटी देण्यात आली. सध्या तालुक्यात 13 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 08 जण होम आयसोलेट आहेत. तर 05 रुग्णांवर यवतमाळ आणि अन्य ठिकाणी उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत तालुक्यात 25 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

हेदेखील वाचा

हादेखील वाचा

हादेखील वाचा

साई लॅपटॉप व कॉम्प्युटर गॅलरीमध्ये मकरसंक्रांती ऑफर

 

Leave A Reply

Your email address will not be published.