जब्बार चीनी, वणी: गुरुवारी दिनांक 26 नोव्हेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 4 रुग्ण आढळलेत. हे रुग्ण वणीतील शास्त्रीनगर 1, एकतानगर 1, भालर काॅलनी 1 आणि वागदरा 1 असे आहेत. पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या कमी-जास्त होत आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहावे. कोरोनाकाळात योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासन नियमित करीतच आहे.
गुरुवारी 57 जणांची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट करण्यात आली. तर पॉझिटिव्ह रॅपिड टेस्ट 03 जणांची झाली. 32 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. अद्याप यवतमाळहून 91 अहवाल येणे बाकी आहे.
तालुक्यात 79 ऍक्टिव्ह रुग्ण
सध्या तालुक्यात एकूण 953 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 851 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. गुरुवारी 7 कोरोनामुक्त व्यक्तींना सुटी झाली. सध्या तालुक्यात 79 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 43 जण होम आयसोलेट आहेत. 10 जणांवर कोविड केअर सेंटरमध्ये तर 26 रुग्णांवर यवतमाळ आणि अन्य ठिकाणी उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे आतापर्यंतची तालुक्यातली मृत्यूसंख्या 23 आहे.
सावधगिरी बाळगणे तेवढेच महत्त्वाचे
गेल्या काही दिवसांत शहरातील रुग्णसंख्या कमी होत असताना आता अचानक शहरातील रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. याशिवाय शहरात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या महिन्यात हा आकडा 20 च्या खाली आला होता. मात्र गेल्या दोन आठवड्यापासून हा आकडा सातत्याने वाढत आहे. सध्या कोरोनाची भीती गेल्याने अनेकांनी सावधगिरी बाळगणे कमी केले आहे. त्यामुळेही रुग्ण वाढण्यास मदत होत आहे.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा