जब्बार चीनी, वणी: मंगळवारी दिनांक 1 डिसेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 2 रुग्ण आढळलेत. यातील 1 रुग्ण वणीतील एकता नगरचा तर दुसरा चिखलगाव येथील आहे. कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहावे. कोरोनाकाळात योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
मंगळवारी यवतमाळ येथून 22 रिपोर्ट आलेत. यात 2 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत व 20 व्यक्ती निगेटिव्ह आल्यात. मंगळवारी 16 व्यक्तींची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट घेण्यात आली. आलेल्या रुग्णांवरून 11 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. अद्याप यवतमाळहून 36 अहवाल येणे बाकी आहे.
तालुक्यात 51 ऍक्टिव्ह रुग्ण
सध्या तालुक्यात एकूण 972 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 898 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. मंगळवारी 04 कोरोनामुक्त व्यक्तींना सुटी देण्यात आली. सध्या तालुक्यात 51 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 33 जण होम आयसोलेट आहेत. 04 जणांवर कोविड केअर सेंटरमध्ये तर 14 रुग्णांवर यवतमाळ आणि अन्य ठिकाणी उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे आतापर्यंतची तालुक्यातली मृत्यूसंख्या 23 आहे.
आजही दक्ष राहणे गरजेचे
गेल्या काही दिवसांत शहरातील रुग्णसंख्या कमी होत असताना आता अचानक शहरातील रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. याशिवाय शहरात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या दोन आठवड्यापासून हा आकडा कमी जास्त होत आहे. सध्या कोरोनाची भीती गेल्याने अनेकांनी सावधगिरी बाळगणे कमी केले आहे. त्यामुळेही रुग्ण वाढण्यास मदत होत आहे. त्यामुळे आजही दक्ष राहणे गरजेचे आहे.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा
[…] मंगळवारी तालुक्यात 2 पॉजिटिव्ह […]