नागेश रायपुरे, मारेगाव: जिल्ह्यात संचारबंदी मुळे सर्व देशी विदेशी दारू दुकाने बंद असल्याने 200ची निप 400 ला ते पण नेहमीच्या ग्राहकाना मिळत असल्याने मद्यपेमींची धाव आता गावठी दारूसाठी ग्रामीण भागातील गावपोडाकडे वळल्याचे वात्सव मारेगाव तालुक्यात घडत आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनच्या प्रभावाने विदेशी दारू पिणारे आता देशीकडे वळत आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्हाधिकारी महोदयांनी “ब्रेक द चेन”अंतर्गत 15 ते 30 एप्रिल दरम्यान जिल्ह्यात संचारबंदी लागू केली. यात जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने सोडून सर्व दुकाने बंदचे आदेश दिल्याने यात देशी विदेशी दारूचे सर्व दुकाने बंद आहेत.
देशी विदेशी दारूचे दुकाने जरी बंद असली तरी नेहमीच्या ग्राहकांना देशी दारूचा पव्वा 200 ला तर विदेशी दारूची निप 400 रुपयांत घरपोच मिळत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सर्व दारूची दुकाने बंद व त्यांना सील लावून असताना मद्यप्रेमींना नेमकी दारू मिळत कशी आहे व कुठून मिळत आहे? हा चर्चेचा विषय बनला असून यावर मात्र उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
वणी दिशेने पेट्रोल पंपकडे जाताना एका लेआऊट परिसरात तर चक्क तेलंगणातील दारू अव्वाच्या सव्वा भावाने मिळत असल्याची ओरड होत असून तसेच यवतमाळ दिशेने जाणाऱ्या शहरापासून काही अंतरावर एका धाब्यावर व बियर बार समोर छुप्या पद्धतीने राजरोसपणे देशीप्रेमींसाठी साठ का माल दौसौ में तर विदेशी प्रेमी साठी दौसौ का माल चारसौ मैं मिळत असल्याने मद्यप्रेमींची धाव आता गावठी मोह फुलांच्या दारू साठी ग्रामीण भागातील गाव पोडावर वळली आहे.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा