ऑस्ट्रेलियातील मुलीशी बोलता बोलता सोडला वरोऱ्यात प्राण

अरविंद बोबडे यांचा उपचारादरम्यान अचानक मृत्यू

बहुगुणी डेस्क, वणी: भूमिपार्क, एम.आय.डी.सी. परिसरातील वेकोलिचे सेवानिवृत्त अधिकारी अरविंद बोबडे (62) यांची गेल्या दोन दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ होती. पुढील तपासणी करण्याकरिता ते नागपुरला रविवार दिनांक 25 मेच्या सकाळी निघालेत. त्यांची गाडी वरोऱ्याजवळ येत असतानाच त्यांची तब्येत अधिकच बिघडली. त्यांना तातडीने वरोरा येथील एका खाजगी डॉक्टरकडे दाखल केले. तेव्हाच त्यांच्या ऑस्ट्रेलियातील विवाहित मुलीचा व्हिडिओ कॉल आला. ते आपल्या मुलीसोबत बोलत होते. तेवढ्यात त्यांना अचानक जबर हार्टअटॅक आला. काही कळायच्या आतच त्यांनी प्राण सोडला.

ही बातमी लगेच पुण्यात नोकरी करणाऱ्या मुलाला व ऑस्ट्रेलियातील मुलीला कळली. नुकतेच अरविंद बोबडे व यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेसकमिटी अध्यक्ष असलेल्या त्यांच्या पत्नी संध्या बोबडे हे एक महिना आस्ट्रेलियाती मुलीजवळ राहून आठ दिवसांपूर्वीच परतले होते. अरविंद बोबडे हे 2 वर्षांपूर्वीच वेकोलिमधून कॅशियर म्हणून सेवानिवृत झाले होते. ते एमआयडीसी भागात भूमिपार्क वसाहतीत राहत होते.

बोबडे यांच्या निधनाची माहिती मिळताच खासदार प्रतिभा धानोरकर, माजी आमदार वामनराव कासावार व काँग्रेस पक्षाचे नेते कार्यकर्ते त्यांचे भूमिपार्क येथील घरी पोहोचले. त्यांच्याप्रती सहवेदना व्यक्त केल्यात. वडिलांचे निधन झाल्याची माहिती मिळताच त्यांचा पुत्र पुणे येथून तर पुत्री ऑस्ट्रेलिया येथून वणीला येण्यासाठी निघालेत. त्यामुळे अरविंद बोबडे यांचे अंत्यसंस्कार सोमवारी सायंकाळी किंवा मंगळवारी सकाळी होतील, अशी माहिती मिळाली.

Comments are closed.