बुरांडा ते खापरी रस्त्याची दूरवस्था, गावकरी संतप्त

वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष

प्रतिनिधी, बोटोणी: बुरांडा ते खापरी या 2 कि.मी अंतराच्या रस्त्याची दूरवस्था झाली आहे. या बाबत वारंवार निवेदन देऊनही यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने गावकरी संतप्त झाले असून त्यांनी जर लवकरात लवकर रस्ता न तयार केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा दिला आहे.

बुरांडा ते खापरी हा रस्ता जिल्हा परीषदेच्या अखत्यारीत येतो. सुमारे 15 वर्षांआधी हा रस्ता जिल्हा परिषदेच्या निधी अंतर्गत तयार करण्यात आला होता. इतके वर्ष होऊनही या रस्त्याच्या डागडुजीकडे दुर्लक्ष झाल्याने रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहे. मे महिन्यात 2 किलोमीटर पैकी अवघ्या एक किमीच्या रस्त्याचीच डागडुजी करण्यात आली. त्यामुळे अर्धा रस्ता चांगाल तर अर्धा रस्ता खड्डेमय अशी सध्या या रस्त्याची परिस्थिती झाली आहे.

गावातील रहिवाशांनी रस्त्याच्या त्रासामुळे वेळोवेळी निवेदन दिली. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. दिनांक 5 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांनी मारेगाव येथे भेट दिली होती. त्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत गावक-यांनी सदर समस्येबाबत निवेदन सादर केले होते. जिल्हाधिकारी यांनी तेव्हा कार्यवाहीचा आदेशही दिला होता. मात्र रस्त्याची डागडुजी काही झाली नाही.

या रस्त्याचे काम लवकरात लवकर झाले नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा खापरी गावातील सुरेश पाचभाई, उत्तम हूसुकले, विनोद कुचनकार, संदीप गुंजेकार, संतोष आवारी, प्रभाकर कुचनकार, पवण उरवते, पुंडलिक हुसुकले, पुरुषोत्तम हुसूकले, अजब काळे आणि गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे देखील वाचा:

शेतक-याची शेतात विश प्राशन करून आत्महत्या

अखेर बेपत्ता असलेल्या राजेंद्रचाही मृतदेह आढळला

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.