सुशील ओझा, झरी: कोविड 19 ची दुसरी लाट सुरू असतांनाच जून जुलै मध्ये तिसरी लाट येणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना याचा धिका मोठ्या प्रमाणात हिणार असल्याचे बोलले जात असल्याने शासन व प्रशासन अलर्ट झाले आहे. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी 15 दिवसात दुसऱ्यांदा झरी तालुक्याचा दौरा करून आढावा घेतला व कोविड सेंटर उभारण्याकरिता जागेची पाहणी सुरू केली आहे.
18 मेला दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ पांढरकवडा उपविभागीय अधिकारी विवेक जॉन्सन यांचा ताफा शिबला आरोग्य रुग्णालयात धडकला. शिबला गावात लसीकरण कमी प्रमाणे होत असल्याने लसीकरण वाढविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. तसेच आरोग्य विभागाच्या नवीन इमारतीला लाईन ची सुविधा नसल्याचे सांगण्यात आले.
यावेळी डॉ अपुल पवार, डॉ जमीर शेख, तसेच आरोग्य सहाय्यक कळसकर, कुडमेते , रणमले, आरोग्य सहाय्यिका ईडपाते, औषध निर्माण अधिकारी जयस्वाल ,प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी स्वाती कुळसंगे , वाहनचालक प्रमोद गेडाम ,परिचर लेदरे ,आशा वर्कर सारिका गेडाम, तसेच पूर्ण आरोग्य कर्मचारी हजर होते.
तिथून झरी येथील आरोग्य केंद्राला भेट देऊन मुकुटबन येथे ताफा पोहचला. प्रथम मुकुटबन येथील आरोग्य केंद्रात भेट दिली व आरोग्य विभागा कडून लसीकरनाची टक्केवारी ,डीलेव्हरी महिला बाबत, गावातील लोकसंख्या, गावात कोरोना बाबत जनजागृती, व इतर बाबत संपूर्ण माहिती घेतली. जे लोक लस घेण्यापासून भीत आहे अश्या लोकांना लस घेण्याकरिता प्रवृत्त करून लसीकरण वाढवा व इतर अनेक सूचना केल्या.
मुकुटबनच्या सरपंच्या मीना आरमुरवार यांनी जिल्हाधिकारी यांना मुकुटबन आरोग्य केंद्राकरिता डॉक्टर व रिक्त कर्मचाऱ्याची जागा भरण्याची मागणी केली.डॉक्टरची जागा भरण्याचे आस्वासन जिल्हाधिकारी यांनी दिली.
आरोग्य केंद्रातून जिल्हाधिकारी यांनी पुनकाबाई आश्रम शाळेची व जिल्हा परिषद शाळेची पाहणी केली. तालुक्यातील सर्वात मोठे गाव असल्याने कोविड सेंटर आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी यांनी स्वतः जाऊन पाहणी केली.
त्यावेळी जिल्हाधिकारी यांच्यासह मुख्यकार्यकारी अधिकारी उपविभागीय अधिकारी यांचेसह तहसीलदार गिरीश जोशी नायब तहसिलदार रामचंद्र खिरेकर गटविकास अधिकारी मुंडकर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ मोहन गेडाम सरपंच सौ मीना आरमुरवार, सचिव कैलास जाधव,तलाठी राणे, पोलीस पाटील दिपक बरशेट्टीवार, मुकुटबनचे ठाणेदार धर्मा सोनूने पाटणचे ठाणेदार संगीता हेलोंडे,पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड उपस्थित होते.
हे देखील वाचा: