सुशील ओझा,झरी: तालुक्यात दररोज कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण वाढत आहे. कोरोना टेस्ट केल्यावर मुद्दाम पॉजिटिव्ह दाखवून लोकांना दवाखान्यात भरती करून पैसे उकळले जात असल्याची चर्चा आहे. तसेच भरती करण्यात आलेले रुग्ण घरी परत येत नाही. अशा अफवा, विविध चर्चेमुळे व गैरसमजांमुळे लोक कोरोना टेस्ट करण्याकरिता जात नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
जनतेच्या मनात शंका व गैरसमज असल्यामुळे अनेकदा टेस्ट करिता ठेवण्यात आल्या शिबिराला प्रतिसाद मिळत नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगितले जात आहे. झरी तालुक्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन गेडाम यांनी तालुक्यातील प्रत्येक नागरिकांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी असे आवाहन केले आहे.
कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळल्यास घाबरण्याचे कारण नाही. त्याचा उपचार फक्त 100 रुपयांच्या औषधीत होऊ शकतो. कोरोना पॉजिटिव्ह असल्याचे निदान लागल्याबरोबर रुग्णाला होम कॉरेंनटाईन करता येते. (ज्याच्या घरी स्वतंत्र रूम ज्यात संडास बाथरूम असेल) अशा ठिकाणी. नाहीतर शेतात जाऊन राहणे किंवा एकटे जिथे राहता येईल. कुणासोबत संपर्क येत नसेल अशा ठिकाणी राहून कोरोनापासून मुक्त होता येते. तेही 100 रुपयाच्या शासकीय रुग्णालयातून दिलेल्या औषधीने. नाही तर फुफुसाला कोरोनाने घर केल्यास श्वास घेण्यास त्रास होतो व इतर त्रास वाढतो.
तालुक्यातील जनतेने स्वतः येऊन कोरोनाची टेस्ट करावी. पॉजिटिव्ह आल्यास 100 रुपयांच्या औषधीमध्ये दुरुस्त होता येऊ शकतं असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन गेडाम यांनी केले आहे. तालुक्यात 11 मे पर्यंत 330 पॉजिटिव्ह अॅक्टीव्ह रुग्ण असून 39 रुग्ण बरे होऊन घरी परत गेले. झरी कोविड सेंटर मध्ये 23 सेंटर मध्ये 24 रुग्ण उपचार घेत आहे तर पांढरकवडा 7 रुग्ण व खाजगी रुग्णालयात 8 रुग्ण भरती आहे.
तालुक्यातील दहा पेक्षा जास्त रुग्ण असलेली गावे झरी येथे 13, मुकूटबन 16, अडेगाव-18, शेकापूर 21,
पाटण 31, डोंगरगाव 17, मार्की 22 व कोसारा 22 रुग्ण आहेत. इतर गावांत रुग्णाची संख्या 10 पेक्षा कमी आहेत. रुग्णालयात कर्मचारी कमी असतानासुद्धा डॉ. मोहन गेडाम हे आपले कर्मचारी सोबत घेऊन दिवसरात्र रुग्णाच्या सेवेकरिता धावपळ करीत आहे.
त्यांच्या प्रशंसनीय कार्याची चर्चा संपूर्ण तालुक्यातून होत आहे. आरोग्य विभागाला तहसीलदार गिरीश जोशी व नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकर मुकुटबनचे ठाणेदार धर्मा सोनुने व पाटणचे ठाणेदार संगीता हेलोंडे यांचे सहकार्य लाभत आहे.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा