विवेक पिदूरकर, शिरपूर: गत काही दिवसांपासून शिरपूर व परिसरात सतत विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून वीज वितरण कंपनीने मनमानी कारभारात सुधारणा करावी. अशी मागणी नागरिकांन कडून होत आहे .
दिवसभरात केव्हाही वीजपुरवठा खंडित केला जात आहे. परिणामी अनेक त्रस्त झाले आहेत. सध्या उन्हाळा तीव्र होत चालला असून तापमानात वाढ होत चालली आहे. लॉकडाऊन असल्याने नागरिक एसी, कुलर व पंख्याची हवा घेत आराम करत आहेत. परिसरातील काही लोक घरीच एका वेगळ्या रूममध्ये विलगिकरणात आहेत. मात्र महावितरणने त्यांना आराम न करू देण्याचा जणू चंगच बांधला आहे.
दिवसभरात कित्येक वेळा लाईन बंद चालू होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. याबाबत वीज वितरण कर्मचाऱ्यांना नागरिकांनी विचारणा केल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. त्यामुळे वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन शिरपूर येथील व परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करावा. येथील वीज वितरणाच्या कारभारात सुधारणा करावी, अशी मागणी केली जात आहे.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा