मारेगावचे माजी सरपंच उत्तमराव गेडाम यांचे निधन

आज 4 वाजता निघणार अंतिमयात्रा

0

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव शहराचे माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव विठल गेडाम (67) यांचे आज प्रदीर्घ आजाराने 11.45 वाजता निधन झाले. गेडाम हे सन 2002 ते 2005 या कालावधीत मारेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच होते. ते कर्करोगाने ग्रस्त होते. त्यामुळे प्रदीर्घ आजाराने आज घरीच निधन झाले.

यांच्यामागे पत्नी गिरजाबाई, मुले ज्ञानेश्वर,अनिल, सुनील, मुलगी अनिता असा मोठा आप्त परिवार आहे. यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आज मंगळवारी दुपारी 4 वाजता त्यांचे राहत्या घरून सुभाषनगर मधून अंतीमयात्रा निघणार आहे.

केवळ मारेगावच नव्हे तर संपूर्ण परिसरात ते लोकप्रिय होते. ते उत्तम नेते आणि कुशल संघटक होते. विविध सामाजिक कार्यात ते अग्रेसर होते. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेदेखील वाचा

हेदेखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.