रस्त्याच्या दागडुजीसाठी आणलेली गिट्टी 6 महिन्यांपासून रस्त्यावरच

झरी नगरपंचायतचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

0

सुशील ओझा, झरी: सहा महिन्यांपूर्वी झरी शहरातील प्रत्येक वॉर्डात सिमेंट काँक्रीटचे रोड निकृष्ट झाल्याची, रस्ता उखडल्याची व साईटपट्टी न भरल्याने रस्ता खचत असल्याची तक्रार माजी स्वीकृत सदस्य अंकुश लेंडे यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्या कडे केली होती. त्या अनुषंगाने खराब झालेल्या रोडच्या कामाकरिता गिट्टी व चुरी आणून टाकल्या गेली. परंतु अजूनपर्यंत एकही रोडची दुरुस्ती न करता सहा महिन्यांपासून रस्त्यावर टाकलेली गिट्टी व चुरी तशीच असून रस्त्यावर पसरली आहे.

यामुळे दुचाकीस्वार व सायकल चालकांना जाणे कठीण झाले आहे व छोटे मोठ्या अपघातात वाढ झाली आहे. नगरपंचायतने सदर रोडच्या कामाची सुरुवात त्वरित करावी तसेच झरी शहर व इतर वॉर्डातील नाल्या व गटारे साफ करून जनतेला इतर आजारापासून वाचवावे अशी मागणी अंकुश लेंडे यांनी केली आहे.

झरी नगरपंचायत होऊन जवळपास पाच वर्षे पूर्ण होत आहे. परंतु गावातील अनेक ठिकावरील नाल्या व गटार पूर्णपणे भरून रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. आधीच कोरोनाची भीती त्यात सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिकांना विविध आजार होण्याची संभावना वाढली आहे. या सर्व प्रकाराकडे नगरपंचायत चे दुर्लक्ष होत असल्याने जनतेत संतापाचे वातावरण पसरले आहे.

हे देखील वाचा:

अखेर नदीपात्रात बेपत्ता झालेल्या तरुणाचा आढळला मृतदेह

तालुक्यात कोरोनाचे 5 रुग्ण, ग्रामीण भागात वाढतोय कोरोना

Leave A Reply

Your email address will not be published.