नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्याची आत्महत्या

हिवरा - मजरा येथील घटना

0

नागेश रायपुरे, मारेगाव: एका नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना 6 मार्च च्या रात्री दरम्यान तालुक्यातील हिवरा- मजरा येथे घडली. बबन रामा आत्राम (24) असे आत्महत्या करणाऱ्या ग्राम पंचायत सदस्याचे नाव आहे.

बबन च्या आत्महत्या चे कारण कळू शकले नाही मात्र त्याच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत बबन आत्राम ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आला होता.

बबन यांच्या पश्चात आई, वडील, दोन मोठे भाऊ व एक विवाहित बहिण असा मोठा आप्तपरिवार आहे. पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा:

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

रस्त्याच्या दागडुजीसाठी आणलेली गिट्टी 6 महिन्यांपासून रस्त्यावरच

घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट

Leave A Reply

Your email address will not be published.