तब्बल पाच महिने लेट झाली कार्यवाही, चर्चेला फुटले पेव

सुरदापूर येथील रेतीचोरी प्रकरणात पाटणला चोरीचा गुन्हा दाखल

0

सुशील ओझा,झरी: तालुक्यातील सुरदापूर येथे अवैध रेतीसाठा जप्त केलेल्या रेतीची चोरी करून रोडच्या कामात वापरल्यावरून पाटण पोलिसांनी अखेर पाच महिन्यानंतर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे चर्चेला पुन्हा पेव फुटले आहे.

Podar School 2025

तालुक्यातील सुरदापूर येथील भुमन्ना जंगावार यांच्या घरासमोर ४ ब्रास व गट क्रमांक ५ मध्ये ३ ब्रास असा एकूण ७ ब्रास रेती २५ मे रोजी नायब तहसीलदार गोल्हर व तलाठी सिद्धीकी यांनी जप्त करून पोलीस पाटील रवींद्र येल्टीवार यांना सुपूर्तनाम्यावर दिला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

जप्त केलेली रेती पंचायत समिती अंतर्गत होणाऱ्या गरीब जनतेच्या कामासाठी वापरण्याकरिता आणण्याचे आदेश तहसीलदार गिरीश जीशी यांनी गटविकास अधिकारी यांना दिले. यावरून दुसऱ्या दिवशी पंचायत समितीचे कर्मचारी रेती आणण्याकरिता गेले असता तेथील रेती रातोरात गायब झाल्याचे आढळले.

तशी माहिती तहसीलदार यांना देण्यात आली. यावरून तहसीलदार यांनी पोलीस पाटील यांच्याकडून माहिती घेतली. तेव्हा महिला सरपंच यांचे पती संनसंनवार व मुरली वैद्य या दोघांनी न विचारता रोडच्या कामात वापरली असे सांगितले. यावरून तहसीलदार गिरीश जोशी यांनी पोलीस पाटील यांना आदेश दिले, की ठाण्यात जाऊन तक्रार देऊन रेती चोरी करणाऱ्या लोकांविरुद्ध तक्रार देऊन फौजदारी गुन्हे दाखल करावेत.

यावरून पोलीस पाटील यांनी ११ जुलै रोजी पाटण पोलीस स्टेशनला लेखी तक्रार केली. यावरून पाटण पोलिसांनी तपास केला. अनेकांचे बयाण नोंदविले; परंतु तक्रार करताच संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याने पोलिसांनी गुन्हा नोंद केला नाही. तलाठी, मंडळ अधिकारी किंवा इतर अधिकारी यांच्या तक्रारीची वाट पाहत बसले होते.

महसूल विभाग तक्रार दिल्याचे सांगून गप्प होते. दोन्ही विभागाच्या तक्रारीच्या खेळीत मात्र रेती चोरटे मोकाट फिरत होते. दोन्ही विभागांच्या तक्रारीच्या खेळीवर विविध चर्चेला पेव फुटले होते. अखेर २७ नोव्हेंबरला तलाठी यांनी परत रीतसर तक्रार दिल्यावरून पोलिसांनी कलम ३७९/३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

अवैध रेतीसाठा चोरी करून रोडच्या कामात वापरल्या प्रकरणी ४ ते ५ जण अडकण्याची दाट शक्यता असून राजकीय वर्तुळात धावपळ सुरू झाली आहे. तसेच अवैध रेती ट्रॅक्टरद्वारे आणून देणारा चोरटा कोण? याचाही शोध लावणे पोलिसांसमोर एक आव्हानच आहे.

चोरटी रेती आणणाऱ्यावरसुद्धा कार्यवाही करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सदर प्रकरणाचा तपास ठाणेदार अमोल बारापत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे करीत आहे.

हेदेखील वाचा

 

हेदेखील वाचा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.