जितेंद्र कोठारी, वणी: ते दोघेही एका लग्नात गेले होते… तिथे त्या दोघांची नजरा नजर होते… लग्न मंडपात व-हाडाच्या गर्दीतही दोघांचा डोळ्यातूनच संवाद सुरु होतो… अखेर तो हिम्मत करून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो… तिही त्याला प्रतिसाद देते… पहिल्याच भेटीत ते एकमेकांचे मोबाईल नंबर शेअर करतात… मात्र हे नंबर शेअर करणे त्या तरुणीला पुढे चांगलेच महागात पडणार याची तिला थोडीही कल्पना नसते… ओळखीतून पुढे मैत्री आणि त्यानंतर ‘लव, ** और धोका’ असा काही प्रकार तिच्यासोबत घडतो. अशीच घटना तालुक्यात घडली असून प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक अत्याचार केल्या प्रकरणी पोलिसांनी मजनूला गजाआड केले आहे.
तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, तरुणी ही 21 वर्षीय असून ती एका महाविद्यालयात ग्रॅज्युएशनच्या प्रथम वर्षाला आहे. दोन वर्षांपूर्वी ती एकदा तिच्या मैत्रिणीच्या लग्नात गेली होती. तिथे तिची कोसारा ता. मारेगाव येथील एका 24 वर्षीय तरुणाची ओळख झाली. त्यांच्या ओळखीचे पुढे प्रेमात रुपांतर झाले. एक दिवस मुलगी कॉलेजमध्ये गेली असता मजनूने तिच्या समोर प्रेमाचा प्रस्ताव ठेवला. त्याच्या प्रेमाला भुलून तिने त्याला ‘हो’ म्हटले. त्यानंतर त्यांच्यात प्रेमळ संवाद सुरू होता.
दिवाळीच्या आसपासची घटना असेल. एक दिवस त्याने तिच्यासमोर थेट लग्नाचा प्रस्ताव ठेवला. प्रेमात बुडालेली प्रेयसीही आयुष्यभराचा जोडीदार मिळणार असल्याने आनंदी होती. तिने त्याचा लग्नाचा प्रस्ताव स्वीकार केला. मात्र मजनुच्या मनात काही वेगळेच होते. त्याने प्रस्ताव स्वीकारताच थेट शारीरिक संबंधाची मागणी केली. याला तिने नकार. मात्र त्याने तिला आता लग्न होणार असल्याने घाबरण्याची गरज नसल्याचे सांगत तिला आपल्या वासनेच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तो सातत्याने तिच्याशी संबंध ठेवू लागला.
मजनूचा प्रेयसीवर जंगलात नेऊन अत्याचार
डिसेंबर महिन्यात म्हणजे 4 महिन्या आधी प्रेयसी कॉलेजमध्ये जात होती. दरम्यान मजनू देखील पिच्छा करत तिच्या मागे आला. त्याने तिला गाठत तिला लॉन्ग ड्राईव्हला जाण्याची इच्छा व्यक्त केली. प्रेयसीने नकार देताच त्याने पुन्हा लवकरच लग्न करणार अशी भूलथाप मारून प्रेयसीला बाईकवर बसवले. लॉन्ग ड्राईव्हच्या बहाण्याने मजनू प्रेयसीला थेट मंदर रोडवरील जंगल परिसरात घेऊन गेला. तिथे एका ‘बना’त आडोश्याला नेऊन मजनूने तिच्यावर अत्याचार केला.
प्रेयसीला प्रियकरचा शारीरिक संबंधाबाबतचा नेहमीचा बहाणा लक्षात आला. तिने आता प्रियकराकडे लग्नासाठी तगादा लावला. मात्र प्रियकर लग्नाचा विषय टाळत होता. पुढे त्याने मार्च महिन्यात लग्न करणार असे सांगितले. मात्र लग्नाबाबतच्या पुढच्या रितीरिवाजाबाबत तो काहीही बोलत नव्हता. शेवटी प्रेयसीला फसगत झाल्याची खात्री झाली. तिने वडिलांना सोबत घेऊन पोलीस स्टेशन गाठले व आरोपी मजनूविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी विरुद्ध भादंविच्या कलम 376 (I) (N) व 417 नुसार गुन्हा दाखल केला व आरोपीला गजाआड केले. प्रकरणाचा तपास ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांच्या मार्गदर्शनात सपोनि शिवाजी टीपूर्ण व सपोनि माया चाटसे करीत आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.