प्रमाणपत्र, दाखला तसेच विविध योजनांचा एकाच ठिकाणी लाभ घेण्याची संधी

गुरुवारी वणीतील कल्याण मंडपम मध्ये 'महासमाधान शिबिरा'चे आयोजन.... प्रलंबित अर्जांचा होणार निपटारा, वणीकरांनी सहभागी होण्याचे आवाहन...

पुरुषोत्तम नवघरे, वणी: जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलिअर, उत्पन्न दाखला, अधिवास, राष्ट्रीयत्व, रेशन कार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड तसेच संजय गांधी निराधार योजना, पीएम किसान योजना याशिवाय वन, कृषी, आरोग्य इ विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी गुरुवारी दिनांक 29 सप्टेंबर रोजी वणीतील कल्याण मंडपम येथे महा समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या महा शिबिरात लाभार्थ्यांना विविध योजना, प्रमाणपत्रे इत्यादींसाठी अर्ज करता येणार आहे. तसेच लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे देखील वितरीत केले जाणार आहे. या महा शिबिराचा वणीकरांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन तहसिलदार वणी यांनी केले आहे.

दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत देशभरात ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पंधरवाड्यात नागरिकांच्या प्रलंबित अर्जांचा स्थानिक पातळीवर निपटारा करण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांना एकाच ठिकाणी विविध योजनांचा लाभ घेता यावा विशेष मोहीम राबवण्यात आली आहे. यासाठी राज्यभरात महा समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. वणीत देखील 29 सप्टेंबर रोजी कल्याण मंडपम येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 ते दु. 4 वाजेपर्यंत हे शिबिर चालणार आहे.

या शिबिरात महसूल, कृषी, वन, आरोग्य विभागाशी संबंधित विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच या विभागाशी संबंधीत विविध अर्ज देखील स्वीकारले जाणार आहे. या शिबिरात वणी शहरातील अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन तहसिलदार वणी यांनी केले आहे.

हे देखील वाचा: 

नवरात्रीनिमित्त ‘एक साडी तिच्यासाठी’ उपक्रमाला सुरूवात

वणीकर पोरांचा नांदच खुळा..! घरीच बनविली हायड्रोजनवर चालणारी सेल्फ ड्रायव्हिंग कार

आता गोल्ड लोन मिळवा अवघ्या दहा मिनिटात… बजाज फायनान्सची सेवा

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.