मृत वाघीण होती 2 महिन्यांची गर्भवती… असा लागला प्रकरणाचा छडा….

पत्रकार परिषदेत प्रकरणाचा उलगडा, एसपी, कलेक्टर, खासदार यांची उपस्थिती

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांगुर्ला जंगल परिसरात झालेल्या वाघिणीच्या निर्घृण हत्येबाबत आज पांढरकवडा येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, खासदार इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती. या पत्रकार परिषदेत या प्रकरणाचा कसा छडा लागला याबाबत माहिती देण्यात आली. या प्रकरणी अशोक लेतू आत्राम (20) व लेतू राम आत्राम (45) रा. पांढरवाणी ता. झरी या दोघा बापलेकांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून वाघिणीचा एक पंजा व 1 नखं जप्त करण्यात आली आहे. तर एक पंजा व 9 नखं जप्त करणे बाकी असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

पांढरकवडा वनविभागाच्या मुकुटबन परिक्षेत्रातील मांगुर्ला जवळ वन क्रमांक 30 मध्ये एका नाल्याच्या जवळील एका गुहेत एक वाघ मृत अवस्थेत असल्याची माहिती रविवारी सकाळी वनविभागाला मिळाली. त्यावरून वनविभागाची टीम तसेच डॉक्टर व व्याघ्र संवर्धनाचे प्रतिनिधी सदर ठिकाणी पोहोचले. त्यावेळी त्यांना गुहेच्या तोंडाशी आग लावल्याचे जळालेल्या लाकडांवरून आढळून आले. तसेच वाघिणीच्या मानेवर जखमेची खुण आढळून आली तसेच छातीत शस्त्राने खुपसल्याचे देखील आढळून आले. धक्कादायक बाब म्हणजे ही वाघीण दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आढळून आले आहे.

वाघिणीच्या हत्येमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. एसपी आणि जिल्हाधिकारी यांनी तातडीने या प्रकरणाचा छडा लावण्याचे आदेश दिले होते. दिनांक बुधवारी दिनांक 28 एप्रिल रोजी पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भूजबळ पाटील यांनी पांढरकवडा व वणी येथील अधिका-यांना सोबत घेऊन घटनास्थळाला भेट दिली व अधिका-यांना तातडीने प्रकरणाचा छडा लावण्याचा आदेश दिला.

एसपींच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखा, सायबर सेल, एसडीपीओ वणी व पांढरकवडा यांची चमू अशा चार चमू ऍक्टिव्ह करण्यात आल्या. एसपी यांच्या सूचनेवरून एसडीपीओ वणी व एसडीपीओ पांढरकवडा यांच्या मार्गदर्शनात या प्रकरणाचा तपास सुरू झाला. वेगवेगळ्या दिशेने प्रकरणाचा तपास सुरू झाला. यात पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी व मुकुटबन पोलीस ठाण्याचे ठाणेदार धर्मा सोनुले, नापोका दिलीप जाधव, सपोउनि ऋषी ठाकूर यांनी विशेष योगदान दिले. त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत ठिकठिकाणी आपले खबरी ऍक्टिव्हेट केले. त्यांच्याकडून माहिती प्राप्त केली.

जप्त करण्यात आलेला वाघिणीचा पंजा व नख

शेकडोंचा फौजफाटा घेऊन गावात धाड
मुकुटबन पोलिसांना या प्रकऱणाचे कनेक्शन तालुक्यातील पांढरवाणी (दुभाटी) या गावात असल्याचा सुगावा लागला. त्यांनी तातडीने याबाबत वरिष्ठांना माहिती दिली. त्यानुसार गावात धाड टाकण्याचा प्लान झाला. यवतमाळ, मुकुटबन, शिरपूर, पाटण, वणी येथील पोलीस कर्मचारी, वनविभागाचे कर्मचारी, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार, एलसीबी पथकाचे प्रमुख हे देखील यावेळी उपस्थित होते. सुमारे 20 ते 25 चारचाकी वाहणांचा व सुमारे 100 च्या वर कर्मचा-यांचा फौजफाटा दुपारी पांढरवाणी गावात दाखल झाला.

पोलिसांनी गावाला घेराव घातला व नाकांबदी करून गावात सर्च ऑपरेशन राबवले. सुमारे 5 वाजताच्या सुमारास आरोपी अशोक लेतू आत्राम (21), लेतू आत्राम यांना गावातून अटक करण्यात आली. आरोपींकडून वाघाचा एक पंजा, एक नख तसेच हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेली बल्लम जप्त कऱण्यात आली.

हे देखील वाचा:

मृत वाघीण होती 2 महिन्यांची गर्भवती… असा लागला प्रकरणाचा छडा….

सलग दुस-या दिवशी तालुक्यात कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त अधिक

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!