चार दिवसांत 470 लोकांची जाग्यावरच कोरोना टेस्ट

मारेगावात विनाकारण फिरणाऱ्यांमध्ये निघालेत 11 पॉझिटिव्ह

0

नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मार्डी चौक परिसरात प्रशासनाकडून नाका बंदी लावण्यात आली. या नाकाबंदीत विनाकारण फिरणाऱ्या लोकांची जाग्यावरच कोरोना तपासणी केली जात आहे. त्यात चक्क 4 दिवसात 470 लोकांची तपासणी केली असता त्यात 11 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे.तर सोबतच 40 व्यक्तीवर एकूण 8 हजार रुपयांचा दंड ठोठाण्यात आला आहे.

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रकोप वाढल्याने, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी महोदयांनी “ब्रेक द चेन” अंतर्गत जिल्ह्यात 9 ते 15 मे परंत संचारबंदीचे कडक निर्बंध लावले. त्यात विनाकारण फिरणाऱ्याची जाग्यावर टेस्ट केल्या जाईल. जीवनावश्यक वस्तुंची दुकाने वगळून उर्वरित दुकाने उघण्याची मुभा राहणार नाही. उघडल्यास 50 हजार रुपयांचा दंड ठोकण्यात येईल. आदी संचारबंदीचे नियम भंग केल्यास कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी महोदयांनी पूर्वीच जाहीर केले होते.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या आदेशानुसार तालुका कोरोना नियंत्रण समितीने आदेशाची अंमलबजावणी करत मारेगाव शहरात मार्डी चौक परिसरात लावण्यात आलेल्या नाकाबंदीत दिनांक 9 में रोजी विनाकारण फिरणारे 100 लोकांची कोरोना तपासणी केली. त्यात 6 पॉझिटिव्ह आढळले आहे. तसेच10 में रोजी 100 टेस्ट 1 पॉझिटिव्ह, 11 में रोजी 150 टेस्ट 3 पॉझिटिव्ह, आज 12 में रोजी 120 टेस्ट 1 पॉझिटिव्ह आलेत.

4 दिवसांत विनाकारण फिरणाऱ्या 470 लोकांच्या जाग्यावरच कोरोना तपासणी करण्यात आली. त्यात 11 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले आहे. सोबतच 40 लोकांवर 8 हजार रुपयांचा दंड ठोकण्यात आला आहे. तसेच शहरांतील एका हार्डवेअर दुकान दारावर सुद्धा 50 हजार रुपयांचा दंड व दुकान सील करण्यात आले आहे.

ही कारवाई तहसीलदार दीपक पुंडे,नायब तहसीलदार दिगंबर गोहोकार पोलीस प्रशासनाचे ,पो.नी.जगदीश मंडलवार,पो.उप.नि.अमोल चौधरी,नगर पंचायतचे मुख्याधिकारी अरुण मोकळ,नोडल अधिकारी निखिल चव्हाण, कर्मचारी गणेश निखाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना देठे, तलाठी संतोष राठोड आदी तालुका कोरोना नियंत्रण समितीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी केली.

नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये 

नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी “ब्रेक द चेन”अंतर्गत संचारबदीचे कडक निर्बंध लावण्यात आले आहे.नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. प्रशासनास तुमच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र झटत आहे. संचारबंदीचा कोणीही नियम भंग करू नये, प्रशासन तुमच्या सोबत आहे. प्रशासनास सहकार्य करावे.

मुख्याधिकारी अरुण मोकळ

हेदेखील वाचा

डॉक्टर मुलाच्या मृत्यूनंतर वडीलांचेही कोरोनाने निधन

हेदेखील वाचा

शिवसेनेच्या रूपात माणूसकी आली धावून….

हेदेखील वाचा

वणीमध्ये आलाये पाण्याच्या टाकीचा डॉक्टर

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.