अज्ञात वाहनाच्या धडकेत इसम ठार

मुकुटबन रोडवरील घटना

0

विवेक तोटेवार, वणी: शहरातील मुकुटबन रोडवर रविवार सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास एका अज्ञात वाहनाच्या धडकेत इसम ठार झाल्याची घटना घडली. मृतक हे शिरपूर ठाण्यात वाहनचालक म्हणून कार्यरत असलेले अभिजित कोशटवार यांचे वडील हाेते.

रविवारी सायंकाळी मारोतराव यशवंतराव कोशटवर (69) रा. ओमनगर वणी हे नेहमीप्रमाणे सायंकाळी 7 वाजता फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडले. ते वणी मुकुटबन रोडवरील निर्गुडा नदीच्या पुलाजवळ असताना अचानक एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. या धडकेत त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यांना त्वरित वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.

त्यानंतर त्यांना वणीच्या एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु चंद्रपूर येथे नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगा अभिजित कोशटवार हे शिरपूर पोलोस ठाण्यात गाडी चालक म्हणून सेवेत आहे. अगोदर ते वणीच्या वाहतूक शाखेत वाहनचालक होते. अतिशय मनमिळावू स्वभावाचे अभिजित यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हेदेखील वाचा

वणीमध्ये आलाये पाण्याच्या टाकीचा डॉक्टर

युवा शेतकऱ्यांची विष प्राशन करून आत्महत्या

हेदेखील वाचा

”पुकारता चला हू मैं”ऑनलाईन संगीत रजनी रंगली

हेदेखील वाचा

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!