जळक्याजवळ अपघात, युवती ठार तर युवक जखमी

0

नागेश रायपुरे, मारेगाव: अज्ञात वाहनाच्या धडकेत 1 ठार तर 1 गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील जळका जवळ आज दुपारी 1.30 वाजताचे सुमारास घडली. कु.अनिशा शंकर बुजाडे (20) रा.मारेगाव असे अपघातात ठार झालेल्या युवती चे नाव असून विशाल श्रावण भानारकर (25) रा.कोंघारा असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नावं आहे.

प्राप्त माहिती नुसार दोघेही MH 29 BN 2406 हिरो कंपनीच्या दुचाकीने यवतमाळ दिशेने जात होते.दरम्यान भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाचे दुचाकीला जबर धडक दिली असता या अपघातात कु.अनिशा बुजाडे हिला मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता उपचार दरम्यान मृत्यू झाला.

विशाल भानारकर हा गंभीर जखमी असल्याने त्याला यवतमाळ येथे हलविण्यात आले. दोघेही यवतमाळ दिशेने कुठे जात होते हे वृत्त लिही परंत कळू शकले नाही.

हे देखील वाचा:

वणीमध्ये आलाये पाण्याच्या टाकीचा डॉक्टर

युवा शेतकऱ्यांची विष प्राशन करून आत्महत्या

अज्ञात वाहनाच्या धडकेत इसम ठार

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!