जितेंद्र कोठारी, वणी: लॉकडाउन व संचारबंदी नियमांतर्गत अत्यावश्यक सेवेसह बांधकाम क्षेत्राला परवानगी देण्यात आली आहे. मात्र ऑटोमोबाईल दुकानांना अत्यावश्यक सेवेत समाविष्ट न केल्यामुळे शासकीय बांधकाम प्रकल्प तासवच शेती कामाला अडथळा निर्माण होत आहे. ऑटोमोबाईल दुकानांना अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करून निर्धारित वेळेमध्ये सुरु ठेवण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हाधिकारी यवतमाळ यांना करण्यात आली आहे.
मनसे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ याना दिलेल्या पत्रात जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्ते,पूल, इमारतीचे बांधकाम तसेच शेती विषयक कामे सुरु असून पावसाळापूर्वी कामे पूर्ण होणे गरजेचे आहे. बांधकाम व शेती कामसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारची मशिनरीमध्ये बिघाड झाल्यास कामे ठप्प पडत आहे.
ऑटोमोबाईल दुकाने सुरु नसल्यामुळे मशीनरीचे स्पेअर पार्ट मिळणे दुरापत झाले आहे. त्यामुळे ऑटोमोबाईल दुकानांना अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करून निर्धारित वेळेमध्ये दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी देण्याची मागणी राजु उंबरकर यांनी केली आहे.
हे देखील वाचा: