आई आणि मुलाची विष प्राशन करून आत्महत्या

कळमना रोडवरील शेतात आढळलेत मृतदेह

0

विवेक तोटेवार, वणी: शनिवार 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता दरम्यान आई व मुलगा आपल्या घरून निघाले. 8 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता त्यांचा मृतदेह हा कळमना रोडवरील कातकडे यांच्या शेताजवळील नाल्याजवळ आढळून आला. त्यांनी आत्महत्या करण्याचे पाऊल का उचलले हे मात्र अद्यापही कळू शकते नाही.

दुर्वास मारोती निखाडे हे त्यांची पत्नी, मुलगा, दोन मुली यांच्यासोबत चिखलगाव येथे राहतात. मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. दुर्वास हे सालगडी आहेत. तर मुलगा राहुल दुर्वास निखाडे (24) हासुद्धा शेतात सालगडी म्हणून काम करतो.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

संगीता दुर्वास निखाडे (45) ही रोजमजुरी करते. 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता दुर्वास हे शेतात कामानिमित्त निघून गेले. ते रात्री शेतात कापूस असल्याने तेथेच झोपी गेले. 8 नोव्हेंबर ला सकाळी मित्रजवळचा डब्बा खाऊन ते दुपारी 3 वाजता दरम्यान आपल्या घरी आले.

त्यावेळी त्यांच्या घराजवळच्या व्यक्तीने त्यांना माहिती दिली की, त्यांची पत्नी व मुलगा हा नाल्यात पडून आहे. जाऊन बघितले तर पत्नी व मुलगा पडून असल्याचे दिसून आले. त्यांनी विषारी औषध प्राशन केल्याचा अंदाज बांधला जात होता. त्यांच्या शवाजवळ विषारी औषधाची बाटली पडून दिसली.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी शव ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविले. विषारी औषध का प्राशन केले हे मात्र अद्यापही कळू शकते नाही. त्यातच दुर्वास यांच्या मुलीचे लग्न जुळल्याची माहिती आहे. या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार कांबळे करीत आहे.

हे पण वाचा

 

 

हे पण वाचा

 

Leave A Reply

Your email address will not be published.