सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या साखरा (दरा) येथे मोठ्या प्रमाणात दारूची अवैधरित्या विक्री सुरु होती. याबाबतचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. त्यावरून ठाणेदार जाधव यांच्या आदेशाने आज मंगळवारी दिनांक 3 ऑगस्ट रोजी या दारू विक्रेत्यांवर धाड टाकून त्यांना रंगेहात पकडण्यात आले. या धाडीत त्यांच्याकडून 60 देशी दारुचे पव्वे जप्त केले.
सकाळी 9.45 वाजताच्या दरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळली की दोन युवक पोत्यात देशी दारूच्या बॉटल भरून विक्रीकरिता साखरा येथे नेत आहे. त्यावरून पोलीस शिपाई संतोष मडावी व जितेश पानघाटे या दोघांनी साखरा फाट्यावर फिल्डिंग लावली. 11 वाजताच्या सुमारात त्या ठिकाणी दोन युवक संशयास्पद रित्या नॉयलनची बॅग घेऊन जाताना दिसले.
पोलिसांनी त्या तरुणांना थांबवून त्यांच्याजवळील बॅगची झडती घेतली असता त्यातील एका बॅगमध्ये देशी दारुच्या 180 मिलीचे 48 नग ज्याची किंमत 2880 रुपये तर दुसऱ्या बॅगमध्ये दारुच्या 20 बॉटल ज्याची किंमत 1200 रुपये अशा एकूण 60 बॉटल आढळून आल्या.
अवैधरित्या दारुची वाहतूक करणा-या एका तरुणाचे नाव उत्तम आनंदराव येलोवार (38) आहे तर दुस-याचे नाव अतुल केशव सोयाम (24) आहे. हे दोघेही साखरा येथील रहिवाशी आहे. आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65 ई अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सदर प्रकरणाचा तपास ठाणेदार अजित जाधव व पोलीस उपनिरीक्षक युवराज राठीड यांच्या मार्गदर्शनात जितेश पानघाटे करीत आहे.
हे देखील वाचा: