लाठी शिवारात सुरु असलेल्या कोंबड बाजारावर पोलिसांची धाड

तिघे जण ताब्यात, 1 लाखांचा मुद्देमाल जप्त

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील लाठी या शिवारात सुरू असलेल्या एका कोंबडबाजारावर शिरपूर पोलिसांनी छापा मारला. यात तिघांना अटक करण्यात आली असून घटनास्थळावरून सुमारे 1 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रविवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

Podar School 2025

लाठी या गावालगत असलेल्या शेतात कोंबडबाजार सुरू असल्याची गोपनीय माहिती शिरपूर पोलिसांना मिळाली. यावरून त्यांनी दुपारी 2 वाजताच्या सुमारास घटनास्थळ गाठले असता तिथे काही लोक कोंबड्याची झुंज लावून त्यावर पैसे (जुगार) खेळत असल्याचे आढळून आले. पोलीस पथकाने तात्काळ या ठिकाणी धाड टाकली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पोलिसांची धाड पडताच घटनास्थळावर पळापळ झाली. मात्र तिघे जण पोलिसांच्या सापळ्यात अडकले. या प्रकरणी सुभाष देवतळे, रा. बेसा, गणेश उलमाले रा. निवली व शंकर कोटनाके रा. तरोडा यांना अटक करण्यात आली. याशिवाय पोलिसांनी घटनास्थळावरून तीन दुचाकी, 900 रुपये रोख रक्कम व दोन मृत कोंबडे असा सुमारे 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

हे देखील वाचा:

जाधव सर्जिकल क्लिनिकचे बुधवारी होणार उद्घाटन

शालेय विद्यार्थ्यांसाठी रविवारी भव्य स्पर्धा परीक्षेचे आयोजन

Comments are closed.