लैंगिक सुखासाठी चक्क दोन मुलांना केलं टार्गेट

अल्पवयीन मुलांसोबत अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या आरोपीला अटक

विवेक तोटेवार, वणी: लैंगिक सुखासाठी कोण किती खालची पातळी गाठेल हे सांगता येत नाही. या नराधमाने तर अल्पवयीन मुलांनाच टार्गेट केलं. त्यांच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केलं. पोलिसांनी त्या आरोपीला तत्काळ अटक केली आहे. शहरातील एका ठिकाणी राहणाऱ्या एका 56 वर्षीय इसमाने दोन अल्पवयीन बालकांवर अनैसर्गिक कृत्य केलं. या प्रकरणी वणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकाच चर्चेला उधाण आले आहे. तक्रार दाखल होताच आरोपीला अटक करण्यात आली.

शहरात एक 56 वर्षीय इसम एकटाच राहतो. त्याचा या दोन 12 व 14 वर्ष वयोगटातील मुलांसोबत परिचय होता. तो नेहमी विविध प्रलोभने दाखवून अनैसर्गिक कृत्य केल्याची तक्रार वणी पोलिस ठाण्यात 2 एप्रिल रोजी दाखल करण्यात आली. या नराधमाने त्यांना घरी बोलावले. जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यांत अनेक वेळा अनैसर्गिक कृत्य केलीत. त्यानंतर मुलांच्या वागण्यात कुटूंबियांना बदल जाणवू लागला. त्यांनी मुलांना विश्वासात घेऊन विचारणा केल्यावर हा खुलासा झाला. परंतु बदनामी होणार म्हणून त्यांनी पोलिसात तक्रार दिली नाही. परंतु आरोपीच्या वागण्यात बदल झाला नाही. त्यामुळे पीडितांच्या कुटुंबीयांनी तक्रार देण्याचा निर्णय घेतला. दोन्ही पीडित वेगवेगळ्या कुटुंबातील असून एका कुटुंबाने तक्रार देताच दुसऱ्याही कुटुंबाने तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसात 377 व पोक्सो नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपी हा वेकोलीत कर्तव्यावर असल्याची माहिती आहे.

Comments are closed.