रावसाहेब दानवे यांच्या व्यक्तव्याचा वणी व मारेगाव येथे निषेध

बारा बलुतेदार महासंघ व नाभिक समाजातर्फे कारवाईची मागणी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची जीभ घसरली व त्यांनी नाभिक समाजाबाबत आक्षेपार्ह व्यक्तव्य केले. याविधानाबाबत नाभिक समाज आक्रमक झाला आहे. या विधानामुळे आता नाभिक समाजाने आक्रमक भूमिका घेतली असून, रस्त्यावर उतरून निदर्शने सुद्धा केली आहे. आपल्या परिसरात वणी आणि मारेगाव येथेही निवेदन देऊन रावसाहेब दानवे यांचा निषेध करण्यात आला आहे. वणीमध्ये बारा बलुतेदार महासंघाचे प्रवीण खानझोडे यांच्या नेतृत्तात उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले तर मारेगाव येथे नाभिक समाजातर्फे निवेदन देऊन रावसाहेब दानवे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना रावसाहेब दानवे यांनी तिरुपती बालाजी येथील नाभिक समाज तिरुमती बालाजी येथे येणाऱ्या भाविकांची अर्धवट काम (टक्कल) अर्धवट करून सोडतो, सरकारमधल्या तिन्हीही पक्षांची अवस्था तिरुपतीमधील न्हाव्यांसारखी झाली आहे अशी टीका दानवे यांनी केली होती. याचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत.

बारा बलुतेदारांचे मत हवे पण त्यांचा आदर नको – प्रवीण खानझोडे
सरकारला समाजातील 12 बलुतेदारांचे मत हवे असते. मात्र प्रसिद्धीच्या हव्यासापोटी एखाद्या समाजाचा आपण अपमान करतोय याचे भान दानवे सारख्या ज्येष्ठ मंत्र्यांना असायला हवे. टीका करताना अल्पसंख्यांक जातीचा हेतू पूरस्सर उल्लेख करून नाभिक समाजाची बदनामी करणा-या दानवेंवर कारवाई झाली पाहिेजे.
– प्रवीण खानझोडे, अध्यक्ष बारा बलुतेदार महासंघ, वणी

निवेदन देते वेळी प्रवीण खानझोडे, सुरेश मांडवकर, बंडू येसेकर, संजय गाथाडे, भास्कर गोरे, राजूभाऊ वाघमारे, जितेंद्र घुमे, पुरुषोत्तम नवघरे, दिलीप वनकर, शशिकांत नक्षिने, आकाश कडुकर, अभय नागतुरे, राजू किन्हेकर, दिवाकर नागतुरे, कवडू जमदाळे, सचिन धाबेकर, अनिल मांडवकर, गणेश वासेकर, संतोष वासणकर, दादाजी वनकर प्रमोद निंबुळकर यांच्यासह बारा बलुतेदार संघाचे सदस्य उपस्थित होते.

मारेगाव येथे नाभिक समाजातर्फे दानवेंचा निषेध
मारेगाव येथेही दानवेच्या व्यक्तव्याचे पडसाद पडले. दानवे नाभिक समाजाची आणि व्यवसायाची जाणूनबुजून बदनामी करत आहेत. त्यामुळे रावसाहेब दानवे यांनी जाहीर माफी मागावी तसेच त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा येणाऱ्या काळात त्यांच्याविरोधात तीव्र अंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मारेगाव येथील नाभिक समाजाने दिला आहे. याबाबत नाभिक समाजातर्फे तहसीलदार यांना निवेदन दिले. यावेळी रवि घुमे, आनंद नक्षणे, अजय धांडे, विनोद नक्षणे, प्रमोद जाभुळकर, प्रमोद नक्षणे, शंकर शेटे, संजय क्षीरसागर, अमित नक्षणे, राजू घुमे, शालिक जांभूळकर, छगन दर्वे, मोरेश्वर बनसोड इत्यादी उपस्थित होते.

हे देखील वाचा:

पोलिसांची वॅन आली अन् ‘झुंड’ची पळापळ, शासकीय मैदानावर राडा

वणीकरांचा मनसेला कौल… पण सर्व विरोधकांची एकी: वारे नगरपालिकेचे भाग 9

Comments are closed.