जितेंद्र कोठारी, वणी: राजूर कॉलरी येथील चुनाभट्टी परिसरात सोमवारी दिनांक 20 डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास अतुल सहदेव खोब्रागडे (40) याचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला होता. अतुलचा गळा आवळून मृत्यू झाल्याचे पीएम रिपोर्टमध्ये स्पष्ट झाल्याने या प्रकरणी आता अज्ञात आरोपीविरोधात खूनाचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. विशेष म्हणजे प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकाची मदत घेतली जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे लवकरच या प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता आहे. दरम्यान याला प्रेमप्रकरणाचा ऍन्गल आहे का? या दिशेनेही तपास सुरू असल्याची माहिती आहे.
सविस्तर वृत्त असे की अतुल हा राजूर येथील हाजी चुना भट्टीवर काम करायचा. रविवार रात्री तो घरी परतला नव्हता. चुना भट्टीच्या शेजारीच मजूर राहुट्या करून राहतात. एका मजुराला सकाळी 6 वाजताच्या सुमारास राहुटीजवळच अतुलचा मृतदेह आढळून आला. मजुरांनी सदर घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी वणीतील ग्रामीण रुग्णालयात पाठवला होता.
अतुल हा मजुरांचे पगार वाटपाचेही काम करायचा. तो रविवारी दुपारी चुनाभट्टी परिसरात आढळला होता. अतुलच्या मृतदेहाच्या छातीवर मोबाईल आढळून आला तसेच त्याचे कपडे अस्तव्यस्त होते. आता हा खून असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान प्रेम प्रकरणाचा याला काही ऍन्गल आहे का याची देखील चाचपणी करून त्या दिशेनेही तपास सुरू असल्याची माहिती आहे. काही दिवसांआधी रासा येथे देखील अशीच एक मर्डर मिस्ट्री समोर आली होती.
हे देखील वाचा:
विदर्भस्तरिय कराटे स्पर्धेत वणीतील विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
Comments are closed.