जितेंद्र कोठारी, वणी : वणी येथून आपल्या गावाकडे एस. टी. बसने निघालेल्या महिलेच्या पर्समधून चोरट्याने सोन्याची पोत व रोख 1200 रुपये लंपास केले. दि. 9 जानेवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता घडलेल्या घटनेबाबत पीडितेने वणी पो.स्टे. येथे तक्रार नोंदविली.
नेरड, ता. वणी येथील किरण नीळकंठ ठावरी (59) ही महिला आपल्या विवाहित मुलीला भेटण्यासाठी 8 तारखेला वणी येथे आली. दि. 9 जानेवारी रोजी गावाकडे परत जाण्यासाठी निघण्याअगोदर तिने आपल्या गळ्यातील सोन्याचे व काळे मणी असलेली पोत व रोख 1200 रुपये छोट्या पर्समध्ये ठेवून पर्स मोठ्या बॅग मध्ये ठेवली.
वणी येथील एस.टी. बस स्थानकावरुन सायंकाळी 5.00 वाजता वणी मुकुटबन बसमध्ये बसून फिर्यादी महिला गावाकडे निघाली. बस वणी येथून 1 किमी बाहेर निघाली असता महिलेनी पर्स उघडून पाहिले. पर्स मधून सोन्याची पोत व रोख रक्कम गायब दिसल्यामुळे तिने आरडा ओरड करून घटनेबाबत बस कंडक्टरला सांगितले.
बसमध्ये चढताना 30 ग्रॅम सोन्याची पोत किमत 60000 तसेच रोख 1200 रुपये असे एकूण 72 हजारांचा मुद्देमाल चोरी गेल्याची तक्रार पीडित किरण नीळकंठ ठावरी दि.9 जाने. रोजी वणी ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम 379 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो.हे.का. सुदर्शन वानोळे करीत आहे.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा
मुख्यमंत्री होण्यापूर्वी “ते” वणी, माजरीला विकायचे किरकोळ सामान….