शिंदोला – कळमना रस्त्याची दुरवस्था, वाटसरू त्रस्त

रस्त्याच्या दुरुस्तीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

0

तालुका प्रतिनिधी, वणी: शिंदोला ते कळमना रस्त्यावर प्रचंड खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. परिणामी वाटसरूंना सदर रस्त्याने प्रवास करताना नाहक त्रास सोसावा लागतो. सद्यस्थितीत रस्त्याची अवस्था पाहता हा रस्ता अपघाताला आमंत्रण देणारा ठरू शकतो. म्हणून सदर रस्त्याचे पुनर्बांधकाम करण्याची मागणी आहे.

वणी तालुक्यातील शिंदोला ते कळमना हा 8 किलोमीटर अंतराचा मार्ग आहे. सदर मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर परिसरातील सिमेंट प्रकल्पात मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांची या रस्त्याने प्रचंड वर्दळ असते. तसेच जिवती, राजुरा, गडचांदूर कोरपना आदी परिसरातील शेतकरी कापूस विक्रीसाठी शिंदोला बाजारपेठेत आणण्यासाठी याच मार्गाचा वापर करतात. सदर रस्त्याचे बांधकाम वीस वर्षांपूर्वी केले होते.

सध्या रस्त्यावरील डांबर पुर्णपणे दिसेनासे झाले आहे. खड्डयांचा अंदाज न आल्यामुळे जड वाहने रस्त्यावरील गाळात फसण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहे. मात्र, याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. म्हणून सदर मार्गाचे पुनर्बांधकाम करण्याची मागणी कळमना, परमडोह, पाथरीच्या ग्रामस्थांनी केली आहे.

हे देखील वाचा:

शेतकऱ्यांचे पीक उद्ध्वस्त करणा-यां गुन्हे दाखल करा

वृद्धाला तरुणाची जबर मारहाण, विरकुंड येथील घटना

Leave A Reply

Your email address will not be published.