दारू तस्करांवर चारगाव चौकी येथे शिरपूर पोलिसांची कारवाई

दोघांना अटक, चंद्रपूर जिल्ह्यात जाणारी पकडली दारू

0

विवेक पिदूरकर, शिरपूर: आज सोमवारी दिनांक 14 डिसेंबरला सकाळी वणी येथून चंद्रपूर जिल्ह्यात दारू तस्करी करणा-या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये 2 तरुणांना चारगाव चौकी येथे अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून देशी दारुचा साठा जप्त करण्यात आला आहे.

पहिल्या घटनेत आरोपी संजय चिंधुजी टिकले राहणार भालर हा तरुण सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास दुचाकीने (MH 34BE 0150) वणीवरून चंद्रपूर येथे दारू घेऊन जात होता. दरम्यान चारगाव चौकी येथे पोलिसांनी त्याच्या गाडीची तपासणी केली असता त्याच्याकडे देशी दारुच्या 60 नग आढळून आले. ज्याची किंमत 3120 रुपये आहे. त्याच्याकडून दारू आणि गाडी असा एकूण 53120 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दुस-या घटनेत आरोपी सुनील नारायण उईके राहणार वणी हा चंद्रपूर येथे त्याच्या दुचाकीने दारू घेऊन जात होता. चारगाव चौकी येथे तपासणी केली असता त्याच्याकडे 2080 रुपयांचा देशी दारुचा साठा आढळून आला. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडून दारू व गाडी असा एकूण 52080 रुपयांचा जप्त केला. दोन्ही आरोपींवर कलम महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमच्या 65 (इ) (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा:

पत्रकाराच्या अटकेविरोधात उपविभागीय पोलीस अधिका-यांना निवेदन

हे देखील वाचा:

रविवारी 7 कोरोना पॉजिटिव्ह

Leave A Reply

Your email address will not be published.