निष्ठावंत शिवसैनिक सुभाष ताजने यांचे अल्पशा आजारांने निधन

धडाडीचा समाजसेवकाला मुकल्याची शहरात प्रतिक्रिया

0

जितेंद्र कोठारी, वणी:  बाळासाहेब ठाकरे यांची विचारसरणीतुन ओतप्रोत येथील कट्टर शिवसैनिक व धडाडीचे कार्यकर्ता सुभाष किसन ताजने (49) यांचे अल्पशा आजाराने आज पहाटे निधन झाले. आदीलाबाद (तेलंगणा) येथील एका खाजगी दवाखान्यात त्यांनी शेवटचे श्वास घेतला.

        

माहितीनुसार सुभाष ताजने यांना 4 दिवसापूर्वी श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. अगोदर त्यांनी वणी येथील एका खासगी डॉक्टरकडे तपासणी केली. मात्र त्यांचा ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्यामुळे यवतमाळ येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 2 दिवसापूर्वी ताजने यांना यवतमाळहून आदीलाबाद येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना अचानक मंगळवारी पहाटे 3.30 वाजता दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

         

सुभाष ताजने यांच्या रूपाने एक कट्टर शिवसैनिक व समाजसेवक गमावल्याने सम्पूर्ण वणी शहरात शोककळा पसरली आहे. सुभाष ताजने यांचे मृतदेहावर आज सकाळी 8 वाजता वणी येथील मोक्षधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. वणी बहुगुणी तर्फे सुभाष ताजने यांना श्रद्धांजली.

हे देखील वाचा:

वणीमध्ये आलाये पाण्याच्या टाकीचा डॉक्टर

आज तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक, आढळलेत 149 रुग्ण

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!