आज तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक, आढळलेत 149 रुग्ण

आज 82 रुग्णांची कोरोनावर मात

0

जब्बार चीनी, वणी: आज सोमवारी दिनांक 3 मे रोजी तालुक्यात रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. आज तब्बल 149 पॉझिटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरात 77 पॉझिटिव्ह आढळलेत तर ग्रामीण भागात 66 पॉझिटिव्ह आढळून आलेत. तर 6 रुग्ण इतर ठिकाणाचे आहेत. आज 82 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान आज यवतमाळ येथे डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये वणीतील एका 54 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. 

वणी शहरात आलेल्या 77 रुग्णांमध्ये रंगारीपुरा येथे सर्वाधिक 7 रुग्ण तर प्रगती नगर येथे 6 रुग्ण आढळून आलेत. रविनगर येथे 4 रुग्ण, आंबेडकर चौक, गुरुनगर, भोंगळे ले आऊट, आरएच कॉर्टर, नारायण निवास, गाडगेबाबा चौक, दामले फैल येथे प्रत्येकी 3 रुग्ण आढळलेत. जैन ले आऊट, दीपक टॉकिज परिसर, माळीपुरा, निळकंठ मालती अपार्टमेंट, आदर्श कॉलनी, टीएचओ ऑफिस, कनकवाडी, आयटीआय कॉलनी, टागोर चौक, सेवा नगर, विठ्ठलवाडी येथे प्रत्येकी 2 रुग्ण आढळलेत. तर गोकुळनगर, आनंद नगर, मनिष नगर, भीम नगर, सुगम हॉस्पिटल, विद्यानगरी, पहाडपुरा, जैताई नगर, हिराणी ले आऊट, नांदेपेरा रोड, विठ्लवाडी, टिळक नगर, टेलिफोन एक्सचेंज जवळ, जत्रा रोड, सीसीसी, सावरकर चौक, देशमुखवाडी, साई नगरी येथे प्रत्येक 1 रुग्ण आढळला आहेत.

तर ग्रामीण भागात गणेशपूर 10 रुग्ण, चिखलगाव येथे 9, राजूर 4, झरपट, पुनवट, लालगुडा, भांदेवाडा, गोवारी कॅम्प येथे 3 रुग्ण शिरपूर प्रत्येकी 2 रुग्ण तर मोहदा, सावरला, कोलार पिंपरी, परसोडा, नायगाव, दरा, पुनवट, शिंदोला माईन्स, पाटण, हिवरा, कुचना (चंद्रपूर), मुर्धोनी, बेलोरा, सोमनाळा, कायर, वांजरी, कुर्ली, भालर, पुरड, कवडशी, मेंढोली, कुंभारखणी, ब्राम्हणी, मुर्धोनी, पळसोनी, तरोडा, बोरगाव, नायगाव, डोर्ली, वाघदरा प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. याशिाय मारेगाव तालुक्यातील 3 रुग्ण, झरी तालुक्यातील 2 रुग्ण तर कोरोपना तालुक्यातील 1 रुग्ण वणी येथे पॉझिटिव्ह आला आहे.

आज यवतमाळ येथून 427 अहवाल प्राप्त झाले यात 104 व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यात. याशिवाय आज 231 व्यक्तींची रॅपिड ऍन्टीजन टेस्ट घेण्यात आली. यात 45 पॉझिटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 15 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे पाठवण्यात आले आहे. आज 82 कोरोनामुक्त रुग्णांना सुटी देण्यात आली.

सध्या तालुक्यात 692 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 40 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 617 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 35 रुग्णांवर यवळमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 3471 रुग्ण आढळून आलेत. यातील 2719 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 60 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)

हे देखील वाचा:

वणीमध्ये आलाये पाण्याच्या टाकीचा डॉक्टर

जळक्याजवळ अपघात, युवती ठार तर युवक जखमी

अज्ञात वाहनाच्या धडकेत इसम ठार

 

Leave A Reply

Your email address will not be published.