मारेगाव तालुक्याला दिलासा, 40 रुग्णांची आज कोरोनावर मात

आज 11 पॉझिटिव्ह, सध्या तालुक्यात 328 ऍक्टिव्ह रुग्ण

0

नागेश रायपुरे, मारेगाव: आरोग्य विभाग कडून मिळालेल्या माहिती नुसार आज 3 मे रोजी तालुक्यातील 40 पॉझिटिव्ह रुग्णांनी कोरोनावर मात करून घरी परतले आहे. तर आज पुन्हा 11 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. आता एकूण ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या 328 झाली आहे.

या आठवड्यातील पहिलाच दिवस मारेगाव तालुक्यासाठी दिलासा दायक ठरला. तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या आता दिवसेंदिवस कमी होत आहे. आज एकूण 115 व्यक्तींनी कोरोना तपासणी केली असता यात 11 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले आहे. 40 पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहे. तर तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या 328 झाली आहे.

तालुक्यातील गावा गावांत कोरोना तपासणी शिबीरे घेतल्या जात आहे. नागरिकांनी स्वतःला व आपल्या कुटूंबाला कोरोनाच्या बचावासाठी प्रत्येकांनी तपासणी करावी व कोरोना लस घ्यावी. तसेच तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदीत शक्यतो घरा बाहेर जाणे टाळावे व प्रशासनास सहकार्य करा असे आवाहन तहसीलदार दीपक पुंडे यांनी केले आहे.

हे देखील वाचा:

जळक्याजवळ अपघात, युवती ठार तर युवक जखमी

आज तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक, आढळलेत 149 रुग्ण

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!