नंदीग्राम एक्स्प्रेस वणी मार्गे पूर्ववत सुरु करा
आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे रेल्वे राज्यमंत्र्याना पत्र
जितेंद्र कोठारी, वणी: नागपूर ते मुंबई व्हाया वणी, अदीलाबाद, नांदेड नंदीग्राम रेल्वे एक्स्प्रेस पूर्ववत सुरु करण्याची मागणी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केली आहे. याबाबत त्यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व विभागीय रेल्वे व्यवस्थापक नागपूर याना पत्र पाठविले आहे.
नागपूर ते वणी, मुकुटबन, आदीलाबाद, नांदेड मार्गे मुंबई जाणारी नंदीग्राम एक्सप्रेस मागील 10 वर्षांपासून सुरु होती. कोविड महामारीच्या काळात सदर रेल्वे बंद करण्यात आली. कोविडचे प्रकोप कमी झाल्यावर नंदीग्राम एक्सप्रेस आदीलाबाद ते मुंबई परत सुरु करण्यात आली. नंदीग्राम एक्सप्रेसमुळे नागपूर, चंद्रपूर, वणी, यवतमाळ येथील प्रवाश्यांना मुंबई जाणे सोईस्कर होत होते. परंतु आता नंदीग्राम एक्सप्रेसचा आदीलाबाद, नांदेड, मुंबई असा प्रवास सुरु आहे. त्यामुळे वणीतील प्रवाशांना याचा मोठा फटका बसत आहे.
सदर रेल्वेचे नागपूर ते वरोरा, वणी, मुकुटबन, पिपळखुटी, आदीलाबाद असा पूर्वीप्रमाणे प्रवास सामान्य जनतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. अनेक सामाजिक व यात्री संघटनांनी याबाबत अनेकदा रेल्वे मंत्रालय व विभागाशी पत्र व्यवहार केले आहे. आणि आता जनता आंदोलनाच्या भूमिकेत आहे.
त्यामुळे नंदीग्राम एक्सप्रेस नागपूर, वणी, मुकुटबन, आदीलाबाद मार्गे सुरु करण्यात यावी. अशी मागणीचे पत्र आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी रेल्वे राज्यमंत्री यांना दिले आहे. तसेच फोनवर बोलणे देखील केले. यावर त्यांना लवकरच यावर कार्यवाही केली जाईल असे आश्वासन देण्यात आल्याची माहिती आमदार बोदकुरवार यांनी दिली.
हे देखील वाचा:
Comments are closed.