MIDC परिसरात केबल चोरी करणा-या दोघांना अटक

सजक नागरिकांनी रंगहाथ पकडून केले पोलिसांच्या स्वाधीन

जितेंद्र कोठारी, वणी: एमआयडीसी परिसरात केबलची चोरी करताना दोन चोरट्यांना परिसरातील नागरिकांनी रंगेहाथ पकडले. मंगळवारी दुपारी ही घटना घडली. अनिकेत दादाराव कुमरे (20) रा. सिंधी ता. मारेगाव व सागर उर्फ गोल्या मोहन पुसाटे (26) रा. भीमनगर वणी असे आरोपींचे नावे आहे. बुधवारी त्यांना कोर्टात हजर केले असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

Podar School 2025

अनिकेत व गोल्या हे दोघे मंगळवारी दिनांक 22 फेब्रुवारी रोजी दुपारी एमआयडीसी परिसरातील गेले. तिथे त्यांनी ट्रु सन्स ऑईल मिल या कंपनीत शिरून त्यांनी तिथून 50 फूट केबल व 20 किलोचे दोन लोखंडी वजन माप चोरले. दरम्यान चोरी होत असल्याची बाब परिसरातील नागरिकांच्या लक्षात आली. त्यांनी दोघांनाही रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांच्याकडून 9 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पोलिसांनी दोन्ही आरोपीविरोधात भादंविच्या कलम 379, 511, 34 अन्वये गुन्हा दाखल केला. बुधवारी या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना त्यांना 14 दिवसांची न्याायालयीन कोठडी सुनावण्यात आली. प्रकरणाचा तपास ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

हे देखील वाचा:

…आणि खुद्द नगराध्यक्षच राहायचे गैरहजर: सत्ता येऊनही तोटा झालेली टर्म

Comments are closed.