घोडदरा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

राष्ट्रसंतांचे विचार ही गावाच्या विकासाची शिडी - बोढाले महाराज

सुरेश पाचभाई, बोटोणी: घोडदरा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. गुरुदेव भजन मंडळ घोडदरा यांच्या पुढाकारातून गावातील हनुमान देवस्थान येथे या पुतळ्याची स्थापना करण्यात आली. बोढाले महाराज व वासुदेव पाचभाई यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले,

खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल, याविषयीची जी उपाययोजना तुकडोजी महाराजांनी सुचविली होती, ती अतिशय परिणामकारक ठरली. राष्ट्रसंतांचे विचार अंगिकारल्यास ग्राम हे सुशिक्षित, सुसंस्कृत होण्यास मदत होते असे प्रतिपादन बोढाले महाराज यांनी यावेळी व्यक्त केले. राष्ट्रसंतांच्या विचारांनी गावातील तरुण वर्ग व्यसन मुक्त होण्यास मदत होईल असे मनोगत वासूदेव पाचभाई यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे आभार दयाल रोगे यांनी मानले. मंडळाचे अध्यक्ष रमेश गोचे, अनिल रोगे, संजय देवकर, दत्ता दुमोरे, सोमा पायघन, प्रभाकर हिवरकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने घोडदरा येथील रहिवाशी उपस्थित होते.

हे देखील वाचा:

कोळसा तस्करांवर धाडसी कारवाई, दोन ट्रक व 41 टन कोळसा जप्त

मारेगाव नगराध्यक्ष पदाची चुरस वाढली, काँग्रेसचा बहुमताचा दावा

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.