महिलांनीही आता सहकार क्षेत्रात पुढाकार घ्यावा: आ. प्रतिभा धानोरकर
वणी येथे वसंत जिनिंगचा शेतकरी सभासद मेळावा संपन्न
जब्बार चीनी, वणी: आज प्रत्येक क्षेत्रात महिला आहे. मात्र सहकार क्षेत्रात महिलांची संख्या कमी आहे. त्यांना या क्षेत्रात पुढे येण्यास मदत करावी व अधिकाधिक महिलांनीही सहकार क्षेत्रात यावे असे प्रतिपादन वरोरा मतदारसंघाच्या आमदार प्रतिभा यांनी केले. गुरुवारी दिनांक 9 सप्टेंबर रोजी वणीतील वसंत जिनिंगच्या सभागृहात वसंत जिनिंगचा सभासद मेळावा पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार वामनराव कासावार होते. यांच्यासह डॉ. पावडे, प्रमोद वासेकर, प्रमोद निकुरे, पुरूषोत्तम आवारी, संध्या बोबडे यांची देखील कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.
पुढे प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की खासदारसाहेब (बाळू धानोरकर) हे मला प्रत्येक क्षेत्रात पुढे आणण्याचा प्रयत्न करतात. याच प्रकारे इतरांनीही आपली पत्नी, मुलगी, ताई, आई यांना विविध क्षेत्रात आणण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे. महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देताना सहकार क्षेत्रात महिलांच्या भूमिकेला प्राधान्य देणे गरजेचे आहे, मत त्यांनी व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात बोलताना वामनराव कासावार यांनी इंदिरा सूतगिरणीच्या दुरवस्थेचा विषय उपस्थित केला. चुकीच्या व्यक्तींच्या हाती सत्ता गेल्याने परिसरातील एकमेव सूतगिरणी आता भंगार चोरीचा अड्डा बनला असल्याची टीका त्यांनी केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड देविदास काळे यांनी केले. लॉकडाऊन काळात मंगल कार्यालयाचे मोठ्या प्रमाणात बुकींग झाले होते. मात्र सर्वसामान्यांच्या मनात संस्थेविषयी असलेली प्रतिमा कायम ठेवत आम्ही सर्वांची शंभर टक्के अनामत रक्कम परत केली. असे असले तरीही विविध मार्गाने संस्था आणखी कशी फायद्यात राहील यासाठी कायम प्रयत्नशील राहणार अशी ग्वाहीही त्यांनी दिली. यावेळी प्रशांत गोहोकार, डॉ. पावडे, प्रमोद वासेकर यांनी देखील सभासद मेळाव्यास मार्गदर्शन केले.
वामनराव कासावार व देविदास काळे यांचा सत्कार
नुकतेच माजी आमदार वामनराव कासावार यांची काँग्रेसच्या राज्य सरचिटणीसपदी तर ऍड देविदास काळे काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली. याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी त्यांना पुढील राजकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजाभाऊ पाथ्रडकर यांनी केले तर संचालन विवेक मांडवकर यांनी केले. उपस्थितांचे आभार संजय खाडे यांनी मानले. यावेळी मोठ्या प्रमाणात संस्थेचे सभासद उपस्थित होते.
हे देखील वाचा:
आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये रेफ्रिजरेटरवर चक्क मायक्रोव्हेव ओव्हन फ्री
Comments are closed.