विमल नारायण मालेकर यांचे निधन

मुकुटबनच्या मोक्षधाम येथे झालेत अंतिमसंस्कार

0

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथील विमल नारायण मालेकर (71) यांचे 14 डिसेंबरला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गावातीलच मोक्षधाम येथे त्यांच्यावर अंतिमसंस्कार झालेत. गेल्या 25 ते 30 वर्षांपासून त्या मुकुटबन येथे राहत होते.

त्यांचे पती नारायण मालेकर हे वनरक्षक म्हणून कार्यरत होते. नारायण मालेकर यांचे निधन काही महिन्यांपूर्वीच झाले होते. विमल मालेकर यांचे निधन झाल्याने परिवार पोरका झाला. काही महिन्यांतच आई-वडलाचे निधन झाल्यामुळे मुलामुलींवर मायेचे छत्र हरवले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

काही महिन्यांतच झालेल्या दोघांच्या मृत्युंमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी, जावई, नातवंड असा आप्त परिवार आहे

हेदेखील वाचा

हेदेखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.