मासे पकडायला गेलेला तरुण तलावात बुडाला

बचाव पथक घेत आहे तरुणाचा शोध

भास्कर राऊत, मारेगाव: मित्रांंसोबत मासे पकडायला तलावात गेलेला युवक बुडाल्याची घटना मारेगाव तालुक्यातील श्रीरामपूर येथे घडली. बापूजी भाऊराव आत्राम वय 25 वर्षे रा. बाभई पोड असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. संध्याकाळ पर्यंत या तरुणाचा शोध लागलेला नव्हता.

तालुक्यामध्ये कुंभा शिवारातील श्रीरामपूर येथे मोठा तलाव आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने तलावाला मोठया प्रमाणात पाणी आलेले आहे. अशातच मासे सुद्धा या पाण्यात मोठया प्रमाणात आलेले आहे. त्यामुळे हे मासे पकडायला अनेक जण तलावात जात असतात. बापूजी हा सुद्धा आपल्या दोन मित्रांसह मासे पकडायला गेला होता.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

तलाव पूर्ण भरलेला होता. या तलावात हे तिघेही मासे पकडायला उतरले. अशातच बापूजी हा त्या पाण्यात बेपत्ता झाला. सोबतच्या मित्रांनी गावातील नागरिकांना ही बाब सांगितली. काहींनी त्या तलावात शोधाशोध केली असता तो कोठेही आढळला नाही. सदर घटनेबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली.

हे देखील वाचा: 

Comments are closed.