भ्रष्टाचारावर गाजली जिल्हा परिषद अध्यक्षाची सभा
प्रणीता घुगुल यांनी उपस्थित केले विविध मुद्दे
सुशील ओझा, झरी: येथील पंचायत समितीला जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी भेट दिली. दरम्यान पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत तालुक्यातील सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदा पवार आढावा बैठकीचे अध्यक्ष होत्या तर मंचावर पंचायत समिती सभापती राजेश्वर गोंड्रावार उप मुख्यकार्यकारी अधिकारी गुडदे गटविकास अधिकारी मुंडकर जिल्हा परिषद सदस्य संगीता मानकर पंचायत समिती सदस्य प्रणिता घुगुल उपस्थीत होत्या.
बैठकीत तालुक्यातील कोविड १९ च्या लसीकरण बाबत अध्यक्ष यांनी संपूर्ण माहिती घेतली. जनतेनी कोविड १९ चे लस घेण्याकरिता जनतेला प्रवृत्त करा तसेच जनजागृती करून ४५ वर्षावरील महिला व पुरुषांना लस घेतील अश्या उपाय योजना करण्यास सांगितले. पंचायत समिती सदस्य प्रणिता घुगुल यांनी येदलापूर येथील पावणे १३ लाखाचे जिल्हा परिषद शाळेचे वॉलकंपाउंड चे अतिशय नित्कृष्ठ करण्यात आले याबाबत अनेक तक्रारी करूनही कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. उलट बोगस झालेल्या कामाचे बिल काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.
कमळवेल्ली ग्रामपंचायत अंतर्गत आरोप्लान्ट च्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे तर सूरला येथील ग्रामपंचायत पेसामध्ये मध्ये येत असुन आदिवादी समाजाचा सरपंच आहे व त्याला माहिती नसतांना सचिवाने लाखो रुपयांचा भ्रष्ट्राचार करून पैसा जमा केल्याची तक्रार सभागृहात मांडल्या. यावरून सभागृह चांगलाच तापला व येदलापूर येथील शाळेच्या वॉलकंपाउंड ची पाहणी करून कोणतेही बिल काढू नये असे सूचना दिल्याची माहिती आहे. तक्रारीच्या ठिकाणावर जाऊन पाहणी का केल्या जात नाही व कार्यवाही का केल्या जात नाही असा प्रश्न विचारला. यावरून गटविकास अधिकारी यांना चांगलेच सुनावले.
अधिकारी यांनी कोरोनाच्या कामात असल्याचे कारण पुढे करून स्वतःला सुरक्षित केले. पंचायत समिती सदस्य प्रणिता घुगुल यांनी उचललेल्या भ्रष्टचराच्या प्रश्नांची चांगलीच चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे. तरी जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या आदेशावरून तीनही ठिकाणच्या तक्रारीची चौकशी होऊन दोषींवर कार्यवाही होणार काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे देखील वाचा:
तालक्यात कोरोना रुग्णसंख्येचा रेकॉर्ड, आज तब्बल 64 पॉजिटिव्ह