Monthly Archives

September 2023

नवीन वागदरा येथे कोंबड बाजारावर पोलिसांची धाड

जितेंद्र कोठारी, वणी : पोलीस स्टेशन अंतर्गत वागदरा (नवीन) येथे कोंबड्याच्या हारजीतवर पैशाची बाजी लावून जुगार खेळताना तिघांना वणी पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी धाड टाकताच काही जण दुचाकीवर पळून जाण्यात यशस्वी झाले. गणेश धोटे (30)…

हाडपक्या (मस्क-या) गणेशोत्सावानिमित्त जैन ले आऊट मध्ये जंगी कार्यक्रम

पुरुषोत्तम नवघरे, वणी: जैन ले आउट येथील मोरया गणेश उत्सव मंडळ (मस्क-या) तर्फे विविध उपक्रम, स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दिनांक 2 ऑक्टोबर पासून हे कार्यक्रम सुरू होणार असून संपूर्ण 10 दिवस विविध कार्यक्रमांची…

जल्लोषात पार पडले युवा संमेलन, कवितांनी वणीकर मंत्रमुग्ध

विवेक तोटेवार, वणी: सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाची हास्यजत्रा झाली असून ही परिस्थिती बदलण्याची ताकद केवळ युवकांमध्ये असून त्यांनी महापुरुषांच्या स्वप्नातील देश घडवण्यासाठी राजकारणात यावे असे आवाहन प्रा. डॉ. संतोष डाखरे यांनी केले. बुधवारी…

मंदरजवळ अपघात, दुचाकीचालक गंभीर जखमी

जितेंद्र कोठारी, वणी: वणी चारगाव घुग्गुस मार्गावर कार आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. तर दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाला किरकोळ इजा झाली. सदर घटना शुक्रवार 29 सप्टे. रोजी सकाळी 11.30 वाजता दरम्यान केसुर्ली फाट्याजवळ घडली.…

मिरवणुकीत ढोलताशा वाजवताना भीमनगर येथील तरुणाचा मृत्यू

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणीतून चंद्रपूर येथे गणेश विसर्जनासाठी ढोल वाजविण्याकरिता गेलेल्या तरुणाचा मिरवणुकी दरम्यान अचानक मृत्यू झाला. मृतकाचे नाव सिद्धार्थ मरकवाडे, वय 32 वर्ष, रा. भीमनगर, वणी असून तो नगर पालिकेच्या घंटागाडीवर कंत्राटी…

उकणी येथील शेततळ्यात आढळला मृतदेह

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालुक्यातील उकणी शिवारात एका इसमाचा मृतदेह आढळला. आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मृत इसमाची ओळख पटली असून मृतक हे लाठी येथील रहिवासी असून त्यांचे नाव शंकर जनार्धन खारकर (44) आहे. पहाटे 5 वाजताच्या…

रानडुकरांकडून खरिपातील पिकांची प्रचंड नासधूस

तालुका प्रतिनिधी, वणी: रानडुकरांचे कळप शेतातील पिकांत शिरून सोयाबीन, कपाशी आदी खरिपातील पिकांचे प्रचंड नुकसान करीत आहेत. मेंढोली येथील एका शेतकऱ्याच्या कपाशी पिकाची प्रचंड प्रमाणात नासधूस करण्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.…

एक दुजे के लिए ! विवाहित प्रेमीयुगुलाची एकत्र आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: एकामेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या विवाहित प्रेमी युगुलाने एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मन हेलावून टाकणारी ही घटना झरी जामणी तालुक्यातील कोडपाखिंडीच्या जंगलात शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. मंदा अर्जुन गाऊत्रे…

गोरक्षण समोर दोन गटात रात्री राडा, 16 जणांविरोधात गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: वणीतील गंगाविहार गोरक्षण (गोशाळा) समोर दोन गटात तुफान राडा झाला. यात दोन्ही गटाच्या 16 जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यातील एक गट हा बजरंग दलाचा तर दुसरा गट हा श्रीराम गोरक्षण संस्थेचा आहे. रात्री 10…

वणीत ईद-ए-मिलाद उत्साहात साजरी, रॅलीने वेधले लक्ष

विवेक तोटेवार, वणी: इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचा जन्मोत्सव (ईद-ए-मिलाद) शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शहरात भव्य रॅली काढण्यात आली तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात 171 रक्तदात्यांनी केले. यात…