सुनील इंदुवामन ठाकरे, नागपूर: कोवीडयोद्धा पोलिसबांधवांचा जय जवान जय किसान संघटनेतर्फे सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कोरोना संसर्गाच्या काळात जीव धोक्यात घालून आपल्या कर्तव्याचे निष्ठेने पालन करून आपले सामाजिक दायित्व जपणाऱ्या पोलिस बांधवांचा अभिमान व्यक्त करण्यासाठी जय जवान जय किसान संघटना शाखा बुटीबोरी येथे आयोजित केला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेेंद्र चव्हाण डीवायएसपी, विनोद ठाकरे पोलिस निरीक्षक टेेंभरी, पल्लवी काकडे पोलिस उपनिरीक्षक, अशोक तलमले स.पो., विजय निकोसे व इतर युनिटचे सर्व पोलिस बांधवांचा सन्मानपत्र, शाल, मास्क, सेनिटायझर देउन सत्कार करण्यात आला.
जय जवान जय किसान संघटनेचे केंद्रिय अध्यक्ष प्रशांत पवार, समन्वयक विजयकुमार शिंदे, सचिव अरुण वनकर, बुटीबोरी शाखेचे अध्यक्ष सुरेशजी गावंडे, उपाध्यक्ष आशुतोष पाठक, सचिव अभिनव फटिंग, विकास मोरे, कुणाल कापसे, विवेक टेंभरे, अभिजीत उपल्लवार, विकास शेंडे, उत्तम सुळके व इतर पदाधिकारी यांच्या हस्ते पोलिस बांधवांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी अध्यक्ष भाषण करताना राजेंद्र चव्हाण म्हणाले की, पोलिसांच्या या कार्याबददल समाज आता गंभीरतेने नोंद घेत आहेत. याचीच पावती जय जवान जय किसान तर्फे करण्यात आलेला हा सत्कार आहे. या पुढे पोलिसांनी जनतेचा विश्वास जिंकण्याकरीता कार्यरत राहावे असे आवाहन केले.
प्रशांत पवार यांनी आपल्या भाषणात गणेश विर्सजनाच्यावेळी नागपूर येथे फुटाळा तलाब येथे दोन दिवस पोलिस अधिकारी, कर्मचारी महिला पोलिस यांच्याकरिता नास्ता, चहा, जेवण, स्वच्छतागृहांची व्यवस्था मागील 5 वर्षापासून करण्यात येत आहे. यावर्षी कोविडमुळे हा बंदोबस्त राहणार नाही.
त्यामुळे खर्च करणारा निधी हा पोलिस कल्याण निधीमध्ये जमा केला जाईल. जय जवान जय किसान संघटनेच्या बुटीबोरी शाखेने कोविडयोद्धांचा सत्कार अभूतपूर्वपणे घडवून आणला. त्याबददल त्यांचे अभिनंदन केले आणि प्रशासनाचे आभार मानले,