नागेश रायपुरे, मारेगाव: पोलिसांची नजर चुकवून अवैध देशी दारूची विक्री करण्याकरिता बोर्डा गावाकडे ‘ते’ दुचाकीने निघाले. घोन्सा रोडवर वनविभाग कार्यालयाजवळ मारेगाव पोलिसांनी सापळा रचून तिथे दोघांना मुद्देमालासह जेरबंद केले. अवैध दारूविक्रेत्यांविरोधातली मारेगाव पोलिसांची ही आठवड्यातील तिसरी कारवाई आहे.
प्राप्त माहितीनुसार सचिन वामन कोंकणवार(25) रा. बोर्डा. ता. वणी आणि संदीप रामदास कास्तरवार (30) रा. वनोजादेवी ता. मारेगाव हे दोघे दुचाकीवरून देशी दारू नेत होते. त्यांच्याकडून 180 मिलीचे 34 पव्वे किंमत अंदाजे किंमत 3400 रूपये आणि हिरो कंपनीची दुचाकी किंमत 25 हजार रुपये असा 28 हजार 400 रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
ही कारवाई मारेगाव पोलीस स्टेशनचे पो. नि. जगदीश मंडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली NCP नीलेश वाढई, विनेश राठोड, राजू टेकाम, बंटी मेश्राम, किशोर आडे यांनी कारवाई केली, आरोपीवर दारू बंदी कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा
[…] […]