मुकुटबन येथील सीसीआयची कापूस खरेदी तीन दिवस बंद
कापसाच्या गाडीवरील व्यक्तीला मास्क बंधनकारक
सुशील ओझा,झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील सीसीआयची कापूस खरेदी शनिवार, रविवार व सोमवारला बंद राहणार आहे. शासकीय सुट्टी शनिवार व रविवार असतेच. परंतु सोमवारला गुरुनानक जयंती असल्यामुळे केंद्र शासनाने सुट्टी जाहीर केल्यामुळे सतत तीन दिवस कापूस खरेदी बंद ठेवण्यात आली आहे.
अशी माहिती तसेच सूचना बाजार समितीचे सचिव रमेश येल्टीवार यांनी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला कापूस सीसीआयकडे विक्रीकरिता आणू नये. असे शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे.
तसेच मंगळवारपासून जे शेतकरी कापसाची गाडी घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितिच्या यार्डात येतील, त्यांनी आपल्या तोंडावर रुमाल, दुपट्टा किंवा मास्क लावल्याशिवाय येऊ नये. मास्क न लावता कापूस गाडी घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यावर १०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून हे पाऊल उचलण्यात आले आहे. तरी शेतकऱ्यांनी आपले व आपल्या जवळील शेतकरी बांधवांचे हीत जोपासत कोविड 19 चे शासनाचे नियम पाळावे. असेही आवाहन करण्यात आले.
शेतकऱ्यांनी सीसीआयच्या कापूस विक्रीकरिता येताना १२ टक्क्यांच्या वर ओलावा (मॉईश्चर) असणारा कापूस आणू नये. तसा कापूस असल्यास स्वीकारणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच कवडीचा कापूस पाण्याने भिजलेला व किडीचा कापूस यार्डात आणू नये. अशा सूचना बाजार समितीचे सचिव रमेश येल्टीवार व सीसीआय शाखा प्रमुख यांनी केले आहे.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा