सुशील ओझा,झरी: तालुक्यातील तेलंगणाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या दिग्रस ग्रामपंचायत तिसऱ्यांदा अविरोध झाली आहे. त्यामुळे गाव आनंदमय झाले आहे. १० वर्ष ग्रामपंचायत अविरोध झाल्यानंतर २०२०-२१ करिता दिग्रस येथील माजी सरपंच नीलेश येल्टीवार यांनी
२९ डिसेंम्बर रोजी स्वतःसह नरेश कावटवार, रामन्ना अनेलवार, व्यंकटम्मा सुरकुंटवार, कृष्णवेणी गडमवार, लक्ष्मीबाई नल्लवार, वंदना तुमाने यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले. परंतु या सातही अर्जांविरुद्ध एकही अर्ज दाखल करण्यात न आल्याने दिग्रस ग्रामपंचायत अविरोध झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
नीलेश येल्टीवार राजकीय पेक्षा सामाजिक कार्यात सर्वात पुढे असतात. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात त्यांचा परिचय आहे. गावातील गोरगरीब जनतेपासून तर सर्वांच्याच समस्या सोडविणे ते आपले कर्तव्य समजतात. कोणत्याही पक्षाचा व्यक्ती असो आर्थिक मदतीपासून मदत करतात. सुख असो की दुःख औषधी दवाखाना तसेच स्वतःच्या वाहनाने पोहचवून मदत करतात. नीलेश येल्टीवार यांचा कुणीही विरोध केलेला नाही.
त्यांच्या तोंडून निघालेला शब्द कुणीही पाडत नाही. त्यांचा गोरगरिबांप्रती प्रेम, गावातील विकासकामे तसेच सर्वांचे चांगले सबंध असल्यामुळे त्यांचा विरोध कुणीही करीत नाही. येल्टीवार यांच्या कामाची पावती म्हणून गावकऱ्यांनी त्यांच्याविरुद्ध कुणीही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. ग्रामपंचायत अविरोध झाली. नीलेश येल्टीवार यांच्या कार्यामुळे गावात आनंद व्यक्त होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा