स्थानिक पत्रकारांच्यावतीने पत्रकारदिन साजरा
मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र 'दर्पण' सुरू झाले होते 6 जानेवारीला
पुरुषोत्तम नवघरे, वणी: बुधवार 6 जानेवारीला स्थानिक पत्रकारांच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला हारार्पण करून पत्रकारदिन साजरा करण्यात आला. मराठी भाषेतील पाहिले वृत्तपत्र दर्पण 6 जानेवारी 1832 रोजी सुरू करण्यात आले. त्या दिवसापासून पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येते.
समाजाचे प्रबोधन व्हावे या उद्देशाने बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी इ.स.1832 रोजी दर्पण नावाचे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. त्या दिवसाची आठवण म्हणून 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात “मराठी पत्रकार दिन” म्हणून साजरा केला जातो. ब्रिटीश राज्यकर्त्यांना कळावे म्हणून त्याकाळी दर्पणचा एक स्तंभ मराठीत व एक स्तंभ इंग्रजीत असे.
यावेळी राजू धावंजेवार, संजय खाडे, रमेश तांबे, सुरेंद्र बोथरा, श्रीकांत किटकुले, मो.मुश्ताक, पुरुषोत्तम नवघरे, महादेव दोडके,अर्जुन मस्के आदी शहरातील पत्रकार उपस्थित होते.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा